Homeटॉप स्टोरीमंत्र्यांबरोबरची चर्चा यशस्वी!...

मंत्र्यांबरोबरची चर्चा यशस्वी! निवासी डॉक्टरांचा संप मागे!!

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर चालू असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज संध्याकाळी मागे घेण्यात आला. संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर केलेल्या चर्चेला यश आल्यानंतर या डॉक्टरांच्या उपस्थितीतच महाजन यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पुकारलेला संप मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.

निवासी डॉक्टरांच्या काही प्रमुख मागण्यांबाबत येत्या दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल. त्यात सकारात्मक निर्णय होईल. त्याचबरोबर येत्या दोन दिवसांत १४३२ पदे भरली जातील. डॉक्टरांचे विविध प्रकारचे देणे लवकरात लवकर अदा केले जाईल असे विविध निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी संप पुकारण्यापूर्वी आपल्याबरोबर चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती. कारण पाच वर्षे आपल्याला वैद्यकीय शिक्षण खात्याचा कारभार चालवण्याची माहिती असल्यामुळे यावर सहज मार्ग निघू शकला असता. परंतु आताही चर्चा होऊन मार्ग निघाला, हे चांगले झाले असेही ते म्हणाले.

आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यातील निवासी डॉक्टर संपावर गेले होते. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर बुधवारपासून हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन कायम सुरू ठेवावे ही मागणी करतानाच, संसदेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा कायदा मंजूर करण्यात आला त्याला विरोध दर्शवण्यासाठी 16 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला होता. यावर मार्ग निघाला नाही तर गुरुवारपासून अत्यावश्यक सेवाही बंद करावी लागेल असा इशारा डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने दिला होता.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content