Homeपब्लिक फिगरअंबड पोलीसठाण्याच्या अधिकाऱ्यांना...

अंबड पोलीसठाण्याच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा!

धर्मांतर, लव्ह जिहाद यासारख्या प्रकरणांमध्ये ज्यांच्याविरोधात तक्रार असते त्यांना ताकद देणारे नाशिकच्या अंबड पोलीसठाण्याचे अधिकारी भगीरथ देशमुख तसेच पोलीस नाईक प्रशांत नागरे यांना तातडीने निलंबित करून त्यांच्या विरोधात उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज नागपूर विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.

महाराष्ट्र पोलिसांची एक वेगळी विश्वासार्हता आहे. परंतु काही पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दलावर नामुष्की येते. याच अधिवेशनामध्ये अहमदनगरच्या एका पोलिस अधिकाऱ्याची  सरकारने बदली केली तर त्याविरोधात तिथे प्रचंड मोठा जनसमुदाय रस्त्यावर उभा केला गेला. विरोधी पक्षाचे काही आमदारही यात सहभागी होते. बहुजनांना त्रास देणारे आणि जनतेविरुद्ध कारभार करणाऱ्या काही लोकांना पाठबळ देणारे असेच हे अंबड पोलीसठाण्याचे अधिकारी आहेत. या परिसरात आज अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात ते याच अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे… काय करायचे ते करा अशी हिम्मत या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये कशामुळे येते, असा सवाल त्यांनी केला.

कायद्यापेक्षा आपण मोठे आहोत अशा आविर्भावात हे अधिकारी वावरतात. यांच्याच कारकीर्दीत 2021-22 या कालखंडात खुनाच्या दहा घटना घडल्या. या दोघांकडे बंगले, गाड्या आहेत. इतके पैसे यांच्याकडे येतात कुठून, असा सवाल करत नितेश राणे यांनी या दोघांनाही तातडीने निलंबित करून त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय किंवा गुन्हा अन्वेषण खात्याकरवी चौकशी करावी अशी मागणी केली.

या सूचनेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून चौकशी केली जाईल. एका महिन्यात चौकशीचा अहवाल मागविला जाईल. त्याचप्रमाणे पोलीस नाईक नागरे यांची ताबडतोब बदली केली जाईल असे आश्वासन दिले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content