Homeएनसर्कलहाऊ टू ब्लो...

हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन?

हवामान बदलाचे संकट हाताळण्यासाठी कुठलीही जादूची कांडी किंवा तातडीचा कुठलाच उपाय नाही. केवळ योग्य संवर्धनावर संवाद आणि हस्तक्षेप हीच किल्ली आहे. ‘हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन’द्वारे आम्ही या महत्त्वाच्या विषयावर योग्य संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनियल गोल्डहाबर यांनी काढले.

गोव्यात 53व्या इफ्फी महोत्सवादरम्यान आयोजित ‘टेबल टॉक’ सत्रात ते माध्यम आणि महोत्सव प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होते. चित्रपट हवामान बदलविषयक टोकाच्या भूमिकेला आम्ही पाठिंबाही देत नाही आणि त्याचा शोधही घेत नाही. काही लोक हवामानविषयक टोकाच्या भूमिकेकडे का ढकलले जात आहेत, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या टोकाच्या भूमिकेचे परिणाम काय होतील याबद्दलदेखील आम्ही स्पष्टपणे बोललो आहोत, असे ते म्हणाले.

या चित्रपटाचा आशिया प्रीमियर इफ्फी 53दरम्यान झाला. हवामान बदलावर संवाद आणि त्याचा सामना करण्याचे प्रयत्न अतिशय मर्यादित आहेत. अशा प्रकारचे संवाद त्या कंपन्या आणि देश घडवून आणतात, ज्यांना हवामान बदलाच्या परिणामांतून काही लाभ मिळत असतो. हवामान बदल हा एक अथांग सागर आहे, जो अजूनही आपल्याला पूर्णपणे समजलेला नाही. हवामान बदलांचे परिणाम त्या देशांना लगेच भोगावे लागत नाहीत. ज्या देशांमुळे हे बदल होत आहेत ते जगाच्या इतर भागात ते जाणवतात. याला तोंड देण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी आहे, असे डॅनियल म्हणाले.

‘हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन’ हा योग्यवेळी आलेला कडक थरारपट तरुण हवामान बदल कार्यकर्त्यांच्या चमूची गोष्ट आहे. त्यांच्या निग्रही आणि टोकाच्या संकल्पाच्या जोरावर घातपात करून एक तेलाची पाईपलाईन उडवून देतात. व्यवस्थेच्या निर्णयांमुळे निर्माण झालेल्या हवामान समस्येवर उपाय म्हणून ते त्याच भाषेत उत्तर देत असतात.

हा चित्रपट अँडर्स माल्म यांच्या 2021 साली प्रकाशित झालेल्या ‘हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन – लर्निंग टू फाईट इन अ वर्ल्ड ऑफ फायर’ या पुस्तकावर आधारित आहे. डॅनियल यांच्या मतानुसार, या पुस्तकात असे समर्थन करण्यात आले आहे की, जगाच्या इतिहासातील गेल्या काही दशकांतल्या प्रत्येक सामाजिक न्याय आंदोलनात घातपात आणि संपत्तीच्या नुकसानाचा काही न काही भाग होता. या पुस्तकावर चित्रपट बनवून, आम्ही या संकल्पनेचे नाट्यकरण केले तर काय होईल, ते आम्हाला बघायचे होते.

सध्याच्या काळातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या विषयवार चित्रपट बनविण्याचे कारण सांगताना डॅनियल गोल्डहाबर म्हणाले की, या विषयाची त्यांना सखोल माहिती असल्याने ते कायमच या विषयावर चित्रपटात बनविण्यासाठी योग्य कथेच्या शोधात होते. माझे पालक हवामान वैज्ञानिक आहेत. मी हवामान बदल आणि त्याच्याशी संबंधित चळवळ बघतच मी मोठा झालो आहे. युरोपियन पुस्तकातून घेतलेल्या, अमेरिकन संकल्पनेवर आधारित, हा एक अमेरिकन चित्रपट आहे. या चित्रपटाची प्रसिद्धी आशियन आणि इतर देशांत झाली तर आनंदच आहे, कारण याचा विषय हा जागतिक आहे.

या कडक आणि योग्य वेळी आलेल्या थरारपटात तरुण पर्यावरणवाद्यांचा एक चमू घातपाताने तेलाची एक पाईपलाईन उडवून देण्याची धाडसी मोहीम पार पाडतात. ती एका मोठ्या हल्ल्याचा भाग असते आणि काही अंशी त्यांनी हवामान बदलाच्या संकटावर दिलेले हे टोकाचे उत्तर आहे.

डॅनियल गोल्डहाबर हे लॉसएन्जेल्स आणि न्यूयॉर्क इथे राहणारे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून दृश्य आणि पर्यावरण अभ्यासात पदवी घेतली आहे. ‘कॅम’ (2018) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. डॅनियल गोल्डहाबर यांचा उल्लेख एक चित्रपट निर्माता म्हणून झाला होता. 

‘हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन’ चित्रपटाचा प्रीमियर टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्लॅटफॉर्म विभागात झाले होते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content