Homeएनसर्कलमालवेअरशोधक तंत्रज्ञानयुक्त क्विक...

मालवेअरशोधक तंत्रज्ञानयुक्त क्विक हील बाजारात!

क्विक हील या जागतिक स्तरावरील आघाडीच्या सायबर सिक्युरिटी उपाययोजना पुरवठादाराने आता गोडीपडॉटएआय (GoDeep.AI) या मालवेअर शोधणाऱ्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन २३ वी आवृत्ती आणली असून त्यातून भविष्यासाठी सुरक्षित उपाययोजनांची निर्मिती केली जाणार आहे.

ही आवृत्ती स्मार्ट, सुरक्षित आणि शाश्वत पद्धतीने तयार केली गेली आहे आणि त्यात कंपनीच्या पर्यावरण संवर्धनाप्रति ध्येयांचा तसेच सायबरसुरक्षा सर्वांसाठी एक मुलभूत हक्क बनवण्याच्या विचारांचा पुनरूच्चार करण्यात आला आहे.

क्विक हील व्हर्जन २३ हे गोडीपडॉटएआयसोबत अधिक स्मार्ट झाले आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानातून सायबर हल्ला शोधून धोक्याचे गांभीर्यच तपासले जात नाही तर विविध प्रकारच्या सखोल अभ्यास, वर्तणुकीचे विश्लेषण आणि अचूक अंदाज यांच्याद्वारे असे धोकेही दूर केले जातात. त्यामुळे धोके शोधण्याचा वेळ खूप कमी होतो, अँटी रॅन्समवेअर संरक्षण, रिअल टाइम इंजिन स्कॅन, अँटी ट्रॅकर आणि डेटा ब्रीचमध्ये सूचना अशा अद्ययावत धोका ओळखणाऱ्या वैशिष्ट्यांसह व्हर्जन २३ अधिक सुरक्षित झाले आहे.

क्विक हीलचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. संजय काटकर म्हणाले की, जागतिक साथीनंतरच्या जगात सायबर हल्ल्यांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. हे हल्ले इतके अद्ययावत झाले आहेत की साधी कार्यान्वयन यंत्रणा संरक्षण किंवा मोफत अँटीव्हायरस त्यांना थांबवू शकत नाही. त्यामुळे क्विक हीलमध्ये आम्ही व्हर्जन २३, या मालवेअर हल्ला स्वतःहून शोधणाऱ्या गोडीपडॉटएआयसोबत सुसज्ज सायबरसुरक्षा उपाययोजनेचा समावेश करून त्याचे नवसंशोधन, पुनर्निर्मिती आणि रचना केली आहे. आम्हाला खात्री आहे की, व्हर्जन २३सारखी स्मार्ट, सुरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत उपाययोजना कार्बन फूटप्रिंट कमी करण्याबरोबरच सर्व टप्प्यावर डिजिटल सुरक्षा देऊन तुम्हाला ‘सिक्युरयुअरपीस’चा लाभ देईल.

ईएसजीवर लक्ष केंद्रित करून शाश्वत भविष्याप्रति वचनबद्धता दर्शवणारे क्विक हील व्हर्जन २३ सीडीरहित आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ई कचरा कमी होऊन कार्बन फूटप्रिंटही कमी होते. कंपनीने बॉक्समधील कागदाचे प्रमाणही कमी केले आहे आणि उत्पादनाच्या बॉक्स पॅकेजिंगचा आकार सुमारे ३८ टक्के कमी केला आहे. त्यामुळे कागदाचा वापर कमी होऊन प्रवासादरम्यान इंधनाचीही गरज कमी होते. हे पॅकेजिंग आता प्लास्टिकमुक्त आहे आणि त्यात १०० टक्के जैव विघटनक्षम आणि १०० टक्के रिसायकल होणारे साहित्य वापरले गेले आहे.

क्विक हीलचे वैध कार्यरत सबस्क्रिप्शन असलेल्या विद्यमान क्विक हीलच्या सर्व वापरकर्त्यांना क्विक हीलच्या वेबसाइटवर भेट देऊन नवीन अपग्रेड मोफत डाऊनलोड करता येईल. नवीन ग्राहकांना क्विक हीलच्या वेबसाइटवरून, ई-वाणिज्य स्टोअर्स किंवा देशभरातील ३५०००पेक्षा अधिक भागीदार स्टोअर्समधून खरेदी करताना अद्ययावत आवृत्ती मिळू शकेल.

Continue reading

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...
Skip to content