Homeटॉप स्टोरीभाजपाकडून पुन्हा ‘महायुती’चा...

भाजपाकडून पुन्हा ‘महायुती’चा प्रयत्न?

महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सामोरे जाताना भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा ‘महायुती’चा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपाने महायुतीचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे. सध्या रिपब्लिकन पक्ष (आठवले), राष्ट्रीय समाज पक्ष असे लहानलहान पक्ष भाजपाबरोबर आहे. शिवसेना भाजपापासून दुरावली होती. मात्र, त्यातला एकनाथ शिंदे गट पुन्हा भाजपाबरोबर आला आहे. आता या महायुतीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहभागी व्हावे, असा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याचे बोलले जाते.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांनी काल राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यापाठोपाठ आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शीवतीर्थ, या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी ही सदिच्छा भेट होती, असे सांगितले. गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण गेलो होतो. महाराष्ट्रात भाजपा वाढवणे हे आपले काम आहे. युती करायची की नाही, याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही ते म्हणाले.

राज ठाकरेही घेणार दसरा मेळावा?

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आतापासूनच दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरू करण्यात आली असतानाच शिवसेनेच्या शिंदे गटानेही दसऱ्याला मेळावा घेण्याची तयारी चालवली जात असल्याचे बोलले जाते. त्यातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दसऱ्याला मेळावा घ्यावा, असा आग्रह मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे यांच्याकडे धरण्यात आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना ही माहिती दिली. हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी दसऱ्याच्या दिवशी कार्यकर्त्यांना संबोधित करावे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content