Homeटॉप स्टोरीसर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या...

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या ठाकरे गटाची बाजू लंगडी?

आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. साऱ्या जगाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. यावर केवळ शिवसेनेचे भवितव्यच अवलंबून नाही तर देशात लोकशाहीचे भविष्य किती काळ राहील, हे स्पष्ट होईल, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू लंगडी असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

११ जुलैला होणारी सुनावणी ही देशात लोकशाहीचे अस्तित्त्व किती काळ टिकणार आहे…. राज्यघटनेनुसार कारभार होणार आहे की नाही असा दिशा देणारा निकाल असेल…. असे ते म्हणाले.

आज एका पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी शिवसेना तसेच शिवसेनेचा धुष्यबाण, हे चिन्ह कोणीही नेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष वेगळा आणि रस्त्यावरचा पक्ष वेगळा आहे. जनतेच्या न्यायहक्कासाठी लढणारी शिवसेना हा रस्त्यावरचा पक्ष आहे. काही आमदार एकाकडे गेले म्हणजे पक्ष तिकडे गेला असे नाही. काही नगरसेवक तिकडे गेल्याचे सांगितले जाते. परंतु महापालिकाच आता अस्तित्त्वात नाहीत. ते शिवसैनिक नाहीत तर ज्यांना त्यांच्या सांगण्यानुसार तिकिटे दिली ते कार्यकर्ते गेले, असे ते म्हणाले.

पैशाचे आमीष, धमक्यांना न जुमानता जे १५-१६ आमदार आमच्याबरोबर राहिले आहेत, त्यांचा सत्कार करायला हवा. आज अनेकजण म्हणतात की, आजही बोलावले तर यायला तयार आहोत. हे मी आधीच बोललो होतो. सूरतला जाऊन बोलायची गरज नव्हती. गेली अडीच वर्षे हेच लोक माझ्या कुटुंबियांविषयी विकृत भाषा वापरत होते. त्यांना विरोध करणारे भाष्य कुणी केले नाही. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसत आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

राष्ट्रपती निवडणुकीत कोणती भूमिका घ्याची याबाबत खासदारांशी, माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेईन, असे ते म्हणाले. राज्यात हिम्मत असेल तर विधानसभेच्या निवडणुका घ्या, असे आव्हानही त्यांनी पक्षातल्या शिंदे गटाला दिले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content