Homeटॉप स्टोरीअनधिकृत मशिदींवर अधिकृत...

अनधिकृत मशिदींवर अधिकृत भोंगे!

काल मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईतल्या सर्व मशिदींच्या भोंग्यांना आम्ही परवानगी दिली असे सांगितले. अशी परवानगी ते कशी देऊ शकतात? आज कित्येक मशिदी अनधिकृत आहेत. मशिदीच अनधिकृत असतील तर त्यावरील भोंगे अधिकृत कसे होणार? म्हणजेच अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानगी… हा काय प्रकार आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फक्त काही विशेष प्रसंगी पोलिसांनी परवानगी दिली पाहिजे. हिंदूंच्या कार्यक्रमांना परवानगी देताना शाळांच्या परिसरात देणार नाही, रूग्णालयाच्या परिसरात देणार नाही. रोजच्या रोज परवानगी घ्यावी लागणार. मग, यांना वर्षाचे ३६५ दिवस परवानगी कशी मिळते? यांनाही रोजच्या रोज परवानगी द्या. त्यांच्या भोंग्यांचा आवाज ४५ ते ५५ डेसिबल इतकाच असायला हवा. म्हणजेच घरी मिक्सर वापरला की येतो ना, तेव्हढा. पोलिसांना दुसरे काही कामच नाही का, की ते रोज दिवसांतून पाच वेळा डेसिबल तपासत राहतील.. असेही ते म्हणाले.

आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. ताब्यात घेतले जात आहे. आपण कोणत्या काळात वावरतो? मोबाईलच्या युगात ताब्यात घेण्याने काय उपयोग होणार? पोलीस अजून ६०-७०च्या दशकात वावरल्यासारखे वागतात. आज मुंबईतल्या ११४० मशिदींपैकी १३५ मशिदींमध्ये पहाटे पाच वाजण्याच्या पूर्वीची अजान लाऊडस्पीकरवरून देण्यात आली. महाराष्ट्र पोलीस या मशिदींविरूद्ध काय कारवाई करणार? का कारवाई फक्त आमच्यावरच, असा सवाल त्यांनी केला.

मशिदींच्या भोंग्यांविरूदधचे आंदोलन हे फक्त आजच्यापुरता मर्यादित नाही तर जोपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरत नाहीत तोपर्यंत अशा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण केलेच जाईल. हा विषय फक्त मशिदींपुरताच मर्यादित नाही तर मंदिरांवरचेही भोंगे उतरवावे लागतील. हा धार्मिक विषय नाही, सामाजिक आहे. पण कोण जर याला धार्मिक स्वरूप देऊ पाहात असेल तर आम्हीही तयार आहोत, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content