Homeएनसर्कल'वेदांत'चा आयपीओ आहे...

‘वेदांत’चा आयपीओ आहे तरी काय?

भारतीय बाजारांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लागलेला आयपीओ धडाका तसाच पुढे सुरू आहे. गुंतवणूकदार आता वेदांत फॅशन्स लिमिटेडद्वारे आलेल्या सार्वजनिक प्रस्तावाकडे डोळे लावून बसले आहेत. मान्यवर, मोही, मंथन आणि त्वमेव यासारख्या काही लोकप्रिय ब्रॅण्ड्समागील शक्ती म्हणून ही कंपनी ओळखली जाते. वेदांत फॅशन्सला बाजारात उतरण्यापूर्वी अत्यंत आवश्यक असलेली मान्यता या ब्रॅण्ड्सच्या एकंदर लोकप्रियतेमुळे प्राप्त झाली आहे आणि जोडीला दमदार वित्तीय कामगिरी नावावर असल्याने, आयपीओ गुंतवणूकदारांना मोठी मूल्यनिर्मिती करून देईल, असे अपेक्षित आहे. वेदांत फॅशन्स लिमिटेडचा आयपीओ काय आहे याबद्दल सविस्तर सांगताहेत एंजेल वनचे एव्हीपी मिडकॅप्स, अमरजीत मौर्य..

कंपनीविषयी:

वेदांतने पुरुषांसाठीच्या एथ्निक ब्रॅण्ड्सवर लक्ष केंद्रित केले आहे आणि प्रामुख्याने भारतातील उत्सवी पोशाखांच्या बाजारपेठेची मागणी कंपनी पूर्ण करते. हे खरेदीचे वन-स्टॉप डेस्टिनेशन असल्यासारखे आहे. वेदांत फॅशन्समध्ये ग्राहकांना सर्व प्रकारच्या प्रसंगांसाठी आवश्यक असलेले एथ्निक (पारंपरिक) कपडे मिळू शकतात. याशिवाय, वेदांत फॅशन्सची उत्पादने मल्टी-ब्रॅण्ड स्टोअर्स, बिग फॉरमॅट स्टोअर्स व ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरही उपलब्ध आहेत.

आयपीओचे तपशील:

प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव आज, ४ फेब्रुवारीला खुला झाला आहे आणि प्रारंभिक विक्री आरएचपीनुसार (रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) ८ फेब्रुवारी रोजी समाप्त होईल. विक्री प्रस्तावामध्ये, प्रमोटर्स व वर्तमान समभागधारकाच्या ३,६३,६४,८३८ इक्विटी समभागांचा समावेश असेल. प्रत्येक समभागाचे दर्शनी मूल्य १ रुपया असेल आणि अपेक्षित दरश्रेणी प्रति इक्विटी समभाग ८२४ रुपये ते ८६६ रुपये असेल. एका लॉटमध्ये १७ समभाग आहेत आणि एक गुंतवणूकदार जास्तीतजास्त १३ लॉट्ससाठी अर्ज करू शकतो. जारीकरणानंतरचे (पोस्ट-इश्यू) बाजार भांडवलीकरण १९,९९८-२१,०१७ कोटी रुपयांच्या आसपास अपेक्षित आहे.

वेदांत

वर्तमान समभागधारणा:

ऱ्हाइन होल्डिंग्जकडे सध्या कंपनीच्या ७.२ टक्के भागाची मालकी आहे, तर ०.३ टक्के केदारा एआयएफकडे आहे. रवी मोदी फॅमिली ट्रस्टकडे कंपनीची ७४.६७ टक्के मालकी आहे. इश्यूचे बुक रनिंग लीड व्यवस्थापक अक्सिस कॅपिटल, एडलवाइज फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल हे आहेत. प्री-इश्यू प्रमोटर होल्डिंग ९२.४० टक्के आहे.

कंपनीच्या कामकाजाचा आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विस्तार:

सप्टेंबर २०२१पासून फर्मच्या जागतिक रिटेल नेटवर्कमध्ये ५४६ एक्स्लुजिव ब्रॅण्ड आउटलेट्सचा (ईबीओ) समावेश आहे. यामध्ये ५८ शॉप-इन-शॉप्स तर अमेरिका, कॅनडा व संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय लोकसंख्या अधिक असलेल्या प्रदेशांतील ११ ईबीओंचा समावेश आहे. अशा रितीने उद्योगाचे एकंदर कार्यक्षेत्र विस्तृत आहे. ते केवळ भारतातच नव्हे, तर वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण बाजारपेठांमध्ये पसरलेले आहे.

सारांश:

सर्वांत प्रसिद्ध मेन्स वेडिंग वेअर ब्रॅण्ड्सपैकी एक असलेला वेदांत लिमिटेड अन्य सूचित आयपीओंच्या स्पर्धेत उतरला आहे. कंपनीची दिशा सकारात्मक दिसत आहे. यात भारताला आघाडीचे स्थान आहे आणि भारतीय ब्रॅण्डने शेअर बाजारात यशस्वीरित्या ठसा उमटवण्याची ही पहिली किंवा अखेरची वेळ नाही. यामुळे ब्रॅण्डला असलेल्या मान्यतेत वाढ होईल आणि त्याच्या इक्विटीला सार्वजनिक बाजारपेठ पुरवली जाईल.

Continue reading

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...

लग्नासाठी भाड्याने मिळणार कोल्हापूरची चित्रनगरी व नितीन देसाईंचा स्टडिओ?

चित्रपट, दूरदर्शन मालिका व जाहिरातींच्या चित्रिकरणास कोणताही अडथळा न आणता कोल्हापूरची चित्रनगरी तसेच कर्जतमधला एन. डी. स्टुडिओ परिसरात विवाह सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर समारंभांसाठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देता येईल का, याबाबत अभ्यास करून स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सांस्कृतिक...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...
Skip to content