HomeArchiveराज ठाकरेंचं 'नवनिर्माण'...

राज ठाकरेंचं ‘नवनिर्माण’ विधानसभेसाठी!

Details
राज ठाकरेंचं ‘नवनिर्माण’ विधानसभेसाठी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
‘विठ्ठलाच्या भोवती बडव्यांच्या घेराव असल्याने मी बाहेर पडत आहे. मला माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण करायचा आहे’.. अशी ऐतिहासिक घोषणा करून महाराष्ट्रातील लाखो तरूणांचे ताईत झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि फायरब्रँड राज ठाकरे आज फायर बँडवाल्याच्या भूमिकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या लोकसभा निवडणूक शामियानात आपल्या मूळ नावाला शोभेल असे ‘स्वरराज’ राग आळवीत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. शिवाजी पार्कवर लाखोंची सभा घेऊन शिवसेनेपासून अनेक पक्षांची झोप उडवून एक ‘नवनिर्माण’ महाराष्ट्रात घडत आहे याची चाहूल आणि भीतीही राजकीय पक्षांच्या मनात निर्माण त्यांनी केली. शिवसेनेतील नाराज शिवसैनिक राज ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले. सन २००६ मध्ये मनसे स्थापन झाली. सन २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत १३ आमदार निवडून आले.

त्यात विशेष म्हणजे शिवसेनेच्या दादर बालेकिल्ल्यातून सात आमदार निवडून आले होते. हा मनसेचा प्रभाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकरिता त्यांच्या उभ्या आयुष्यात मोठा धक्का होता. ज्याला मांडीवर खेळवले, राजकारणाचे धडे दिले तोच आपली संघटना खिळखिळी करतोय हे ‘याचि देही याचि डोळा’ पाहून त्यांना दुःख आवरेना आणि शिवसेनाप्रमुख तिथेच खचले. राज ठाकरे यांच्या मनसेची घोडदौड ही बाळासाहेबांना आव्हान देणारी ठरली. त्याच मनसेचा ग्रामीण भागातील शिरकाव पाहून शरद पवारांपासून अनेक नेत्यांची झोपमोड झाली. नाशिकचे स्वयंघोषित राजे छगन भुजबळ यांची नाशिक महानगरपालिका राज ठाकरेंनी काबीज केली आणि नाशिकचा चेहरामोहरा त्यांनी बदलला. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला ‘नवनिर्माण’ म्हणजे काय याची ओळख करून दिली ती राज ठाकरे यांनी..

अशा या मजबूत मनसेची २०१४ पासून घसरण सुरू झाली. नाशिक पालिका हातातून गेली. मनसेच्या १३ व्या वर्धापनदिनापर्यंत एकही आमदार शिल्लक राहिला नाही. आमदारांपैकी एकच आमदार निवडून आला तो ही नुकताच शक्तीप्रदर्शन करीत शिवसेनेचे शिवबंधन मनगटावर बांधून घेत स्वगृही परतला. म्हणजे राज ठाकरे यांच्याकडे ना आमदार राहिला तर मुंबईत जेमतेम एक नगरसेवक राहिला. अशावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हुकूमशाहीवर हल्लाबोल करण्याचा इरादा पक्का केला. राजकारणात पक्ष आणि कार्यकर्ते जिवंत ठेवणे मोठे जिकरीचे असते. हा विचार करूनच राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर शाब्दिक स्ट्राईक करत आहेत. यात त्यांचं काय चुकलं असे वाटत नाही. मुंबईतील कम्युनिस्ट पार्टीचे खच्चीकरण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शिवसेनेला हाताशी धरले आणि शिवसेनाऐवजी वसंतसेना अशी टीका बाळासाहेबांवर झाली. मूळचे व्यंगचित्रकार असलेले बाळासाहेब यांनी भाजपाला कमळाबाई म्हणून कायमचे हिणवले. म्हणून भाजपाने सेनेची साथ सोडली नाही. देशात फक्त भाजपाचे दोन खासदार असताना आणि भटजी, शेटजींचा पक्ष म्हणून ओळख असलेला भाजप शिवसेनेच्या सोबत राहून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अखंड भारतात व्यापला.

उद्योगपती रतन टाटा यांच्या सांगण्यावरून राज ठाकरे यांनी गुजरात दौरा केला आणि त्यांना प्रत्यक्षात सांगितला जात होता गुजरात हा वेगळा दिसला. गुजरातपेक्षा आपणाला महाराष्ट्र कितीतरी पटीने प्रगतीपथावर आहे हे नंतर त्यांना समजले. त्यामुळे मोदी आणि अमित शाह यांच्या मनमानी कारभारावर त्यांनी सडकून टीका करण्यास सुरूवात केली. त्याचा प्रारंभ त्यांनी त्यांच्या १३व्या वर्धापनदिनी केला. मोदी-शाह ही प्रवृत्ती हद्दपार करण्यासाठी भाजपाविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली. यासाठी नोटाबंदीचा परिणाम, शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्त्या, कर्जमाफी, बेरोजगारी, स्टार्ट अप इंडिया, मोदींच्या कोट्यवधी रूपयांच्या जाहिराती असे लोकांना भावणारे आरोप करून भाजपाविरोधात मनसेस्टाईल प्रचार सुरू करून त्यात मोदींच्या फसव्या घोषणांचे चित्रिकरण दाखवून एक अनोखा प्रचार राज ठाकरे यांनी सुरू केला. कदाचित या अनोख्या प्रयोगाचे भविष्यात इतर पक्ष अनुकरण करतील. त्यांच्या या प्राचारात भाजपाला झोडपत असताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली नाही. त्यामुळे भाजपाच्या पारड्यात जाणारी मराठी मते शिवसेनेकडे वळतील. त्यामुळे भाजपाला मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या शहरी भागात फटका बसू शकतो. शिवाय मनसेचे कार्यकर्ते पूर्वीचे शिवसैनिक असल्याने भाजपाला मते न देता शिवसेनेला देतील. कारण शिवसेना-भाजपा युती ही लोकसभापुरतीच मर्यादित असल्याने विधानसभा निवडणुकीत ही युती राहीलच असे नाही. परंतु मोदी-शाह यांची लाट २०१४ सारखी नसल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपाला सेनेशी जवळीक साधावी लागणार आहे.

राज ठाकरे यांचा हा नवीन पवित्रा हा त्यांचा पक्ष अस्तित्वा सत ठेवण्यासाठी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत कोट्यवधी रूपयांची रेलचेल असते. त्यामुळे मनसेला ते शक्य नाही. अशा अशक्यप्राय परिस्थितीत पक्ष व कार्यकर्ते यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न ऐरणीवर प्रामुख्याने पुढे येतो. याचा विचार राज ठाकरे यांनी केला असावा. कार्यकर्त्यांना कार्यक्रम देणे हा उद्द्येश लक्षात घेऊनच त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी जवळीक साधली. राष्ट्रवादीकडे गर्दी खेचणारा नेता नसल्याने पवार यांनी राज ठाकरे यांना जवळ केले. पूर्वी हेच काम छगन भुजबळ यांच्याकडे होते. वयोमानानुसार त्यांना हे आज अशक्य असल्याने भुजबळांना कायमचा विरोध करणारे राज ठाकरे यांना राष्ट्रवादीबरोबर घेऊन पवारांनी आपली शैली वापरली. वैशिष्ट्य म्हणजे सभेत गर्दी खेचणारे छगन भुजबळ, राज ठाकरे आणि डॉ. अमोल कोल्हे हे तिघेही शिवसेनेच्या मुशीतून तयार झालेले नेते आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील हे नेते त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित आहेत. राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे गर्दी खेचणारे नेते आहेत.

ते एकटे काय व किती प्रचार करू शकतात हा खरा प्रश्न आहे. तस पाहिले तर धनंजय मुंडे हे काय मुळचे राष्ट्रवादीचे नेते नाहीत. पवारांनी हे पार्सल भाजपातून राष्ट्रवादीत आणले. थोडक्यात राष्ट्रवादीचे सभा गाजविणारे नेते सुस्तावले आहेत. सत्तेचा वारेमाप फायदा घेऊन सात पिढयांची सोय करून ताठ मानेने हे फिरणारे नेते फक्त स्वत:च्या घरातील मुले किंवा नातेवाईक राष्ट्रवादीत स्थिरस्थावर कसे होतील यातच रमले. शरद पवारांना हे माहीत नव्हते का? त्यांना याची जाणीव होती. पण राजकारण हा विचारांवर नाही तर सत्तेतून जमवलेल्या पैशावर चालते. हे शरद पवारांचे सूत्र आहे. पाच वर्षे राष्ट्रवादी सत्तेत नव्हता तरीही ते लोकसभा निवडणुकीत ताकदीने उतरले आहेत. राज ठाकरे यांच्याकडे सत्ता नसल्याने, लोकसभा निवडणूक लढविणे अशक्य असल्याने, पक्ष व कार्यकर्ते जिवंत ठेवण्यासाठी त्यांना मोदी-शाहविरोधात आक्रमक होऊन महाराष्ट्रात भाजपाला रोखण्याचा हा प्रयोग करावा लागत आहे. शरद पवार व राज ठाकरे यांच्यात काका-पुतण्याचं अघोषित नातं निर्माण झाल्याने ठाकरे राष्ट्रवादीला जीवदान देण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

काँग्रेसने राज ठाकरेंना स्वीकारले नाही. हिंदी पट्टा काँग्रेस विरोधात जाण्याची दाट शक्यता असल्याने ते मनसेला विचारात घेत नाहीत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मनसेच्या पाठींब्याबाबत एकही अवाक्षर काढले नाही. त्यामुळे मनसे सैनिक काँग्रेसला मतदान न करता शिवसेनेला मते देतील. शिवाय मुंबईत उभे असलेले संजय निरूपम यांनी राज ठाकरे यांची “लुख्खा” म्हणून संभावना केली होती. हे मनसैनिकांना पटणारे आहे का? राज ठाकरे यांनी ‘फक्त संजय निरूपम यांना मतदान करू नका’ असे जाहीर केले असते तर मराठा बाणा काय असतो हे दाखविण्याची त्यांना संधी होती. ती ठाकरे यांनी गमावली. राज ठाकरे असे का बोलले नाही, त्यांच्यात व काँग्रेसमध्ये काही गुफ्तगू झाले आहे का? तसे असेल तर ते मनसे कार्यकर्त्यांना ते पटेल का? राज ठाकरे समर्थक मतदार काय व कसे मतदानाच्या दिवशी मतदान करतील हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. तोवर राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या हाताला काम देतील आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला कशी रणनीती करायची याचा त्यांनी पुरेपूर विचार केला असेल. महाराष्ट्रात “नवनिर्माण” करायचं या उद्देशाने मनसे स्थापन करण्यात आली. परंतु ठाकरेंचा हा नवनिर्माण नोहेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी आहे.”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...
Skip to content