HomeArchiveअभिनेते व क्रिकेटपटूंनी...

अभिनेते व क्रिकेटपटूंनी चिनी वस्तुंच्या जाहिराती सोडाव्यात : कॅट

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“लडाख भागातील सीमेवर चीनकडून सुरू असलेली आगळीक व 20 भारतीय सैनिकांच्या मृत्युच्या पार्श्वरभुमीवर भारतीय अभिनेते व क्रिकेटपटूंनी चिनी वस्तुंच्या जाहीराती करू नयेत असे आवाहनही कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने केली आहे. दिपिका पदुकोण, आमीर खान, विराट कोहली, रणवीर सिंह, सारा अली खान, रणबीर कपूर, विकी कौशल आदींनी चिनी कंपन्यांबरोबर केलेले करार रद्द करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.”
 
“‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट) तर्फे सुरू असलेल्या चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या आंदोनलाची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय संगठन मंत्री ललित गांधी यांनी दिली. चीनच्या या कृत्याला सरकार व लष्कर त्यांच्या पध्दतीने उत्तर देईलच, परंतु देशाचे जबाबदार नागरिक या नात्याने जनतेनेही आपल्या पध्दतीने या प्रकाराला उत्तर द्यावे अशा अपेक्षेने कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी. सी. भारतीय, राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल, राष्ट्रीय संगठन मंत्री ललित गांधी, उपाध्यक्ष धैर्यशील पाटील व अन्य पदाधिकार्यां नी हे आवाहन केले आहे.”
 
“सरकारने चीनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे तत्काळ रद्द करावीत. गेल्या काही दिवसांतील सरकारी टेंडर्समध्ये चिनी कंपन्या अत्यंत कमी दराने निविदा भरून सरकारी कंत्राटे हस्तगत करत आहेत, हे पाहता सरकारने भारतीय कंपन्यांसाठी अतिरीक्त दर देण्याची विशेष तरतूद करून भारतीय कंपन्यांनाच कंत्राटे द्यावीत अशी मागणीही संघटनेने केल्याची ललित गांधी यांनी सांगितले.”
 
“पेटीएम, बिग बास्केट, स्विगी, फ्लिपकार्टसारख्या भारतीय कंपन्यांमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे ही आगामी आर्थिक आक्रमणाची नांदीच आहे.”
 

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content