Details
स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा!
01-Jul-2019
”
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण स्मृति वर्षानिमित्त लहानग्यांना आणि तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेऊन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक २७ जानेवारी २०१९ ला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजीपार्क, दादर, मुंबई येथे होणार आहे. मुंबई आणि राज्यभरातील नामांकित शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस आणि स्पर्धाप्रमुख विज्ञानेश मासावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही राज्यस्तरीय स्पर्धा होत असून शालेय, महाविद्यालय आणि खुल्या गटांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सहभागाचे प्रशस्तीपत्रकही प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येईल.
‘चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी, विज्ञान-तंत्रज्ञान-इतिहास यातून चित्रकला साकारून तेजस्वी राष्ट्रभक्तीला प्रेरणा मिळावी, यासाठी जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांच्या कौशल्याला संधी देण्याचा हा प्रयत्न आहे.’ असे स्पर्धा प्रमुख विज्ञानेश शंकर मासावकर यांनी सांगितले.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी मयुरेश आंबेडे- ९७७३३५४१८५, सागर पाटील- ९८१९००६७६४, नरेश जंबुकर- ९८७००२०५०० स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक ०२२-२४४६ ५८७७ या क्रमांकावर संपर्क साधावा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजीपार्क, दादर, मुंबई येथे स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी https://www.savarkarsmarak.com या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन स्पर्धा प्रमुख विज्ञानेश शंकर मासावकर यांनी केले आहे.
रविवार, सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत विविध गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाईल.
गट १- इयत्ता १ ली ते २ री वेळ – सकाळी १०:०० ते ११:३०
विषय: १. माझा निसर्ग २. चौपाटीची स्वच्छता करताना… ३. माझी बाग ४. माझा आवडता खेळ ५. संगणक ६. आवडत्या पक्ष्यासोबत/प्राण्यासोबत…७. झेंडावंदन ८. आई आणि मूल ९. मी बाबांचे बूट आणि चष्मा घालतो.
गट २ – इयत्ता ३ री ते ४ थी, वेळ – सकाळी १०:०० ते ११:३०
विषय : १. दीपावली २. गड-किल्ले कचरामुक्त ३. शाळेतील स्वच्छता अभियान ४. वाहतुकीचे नियम पाळताना… ५. भिंतीवर राष्ट्रभक्तीपर चित्रे काढताना… ६. सर्कस पाहताना ७. शिवजयंती मिरवणूक ८. गावची जत्रा ९. गणशोत्सव.
गट ३ – इयत्ता ५ वी ते ७ वी, वेळ – सकाळी १०:०० ते १२:००
विषय : १. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातील खालीलपैकी कोणतीही एक प्रभावी घटना
अ. अष्टभुजा देवीसमोर स्वातंत्र्य प्राप्तीसाठी घेतलेली शपथ, आ. परदेशी कापडांची होळी, इ. त्रिखंडात गाजलेली अुडी, ई. सावरकरांचे बालपण आणि सवंगडी, उ. सावरकरांच्या कोणत्याही ग्रंथाचे मुखपृष्ठ, ऊ. अंदमानातल्या कारागृहातील सावरकर, ए. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दलितोद्धार कार्य २. संभाजी महाराज ३. प्रतापराव गुजर यांचे शौर्य ४. येसाजी कंक यांचा भीम पराक्रम ५. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचे क्रांतिकार्य ६. परिसरातील स्वच्छता अभियान ७. भूकंपग्रस्तांना मदतकार्य ८. नैसर्गिक उर्जा आणि फायदे ९. भारतीय युद्धनौका.
गट ४ – इयत्ता ८ वी ते १० वी,वेळ – दुपारी १२:३० ते ३.००
विषय : १. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रभावी घटना २. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील प्रसंग – अ. रत्नागिरीत सावरकरांनी केलेल्या सामाजिक सुधारणा , आ. विज्ञाननिष्ठ सावरकर, इ. स्टुटगार्डमधील सभेत मादाम कामा यांनी फडकावलेला पहिला स्वातंत्र्यध्वज, ई. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दलितोद्धार कार्य, उ. अंदमानातील सावरकरांचे क्रांतिकार्य, ऊ. स्वदेशीचा पुरस्कार करणारे सावरकर, ३. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील कोणताही एक प्रसंग, ४. विनयभंग करणाऱ्याशी प्रतिकार/झुंज ५. हिंदुस्थानातील प्रेरणादायी स्थळांना भेट, ६. कौशल्ययुक्त आणि डिजिटल भारत, ७. बदलत्या तंत्रज्ञानाचा परिणाम ८. रेल्वेस्थानकात स्वच्छता अभियान ९. जलसंधारण काळाची गरज, १०. मैदानातून हरवली पाखरे…
गट ५ – महाविद्यालय आणि गट ६ – खुला १५ वर्षांवरील कोणाही व्यक्तींसाठी
वेळ – दुपारी १२:३० ते ३.००
विषय : १. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे समाजक्रांतीतील दलितोद्धार २. दहशतवाद्यांशी भारतीय सैनिकांची झुंज ३. पहाट व्यसनमुक्तीची ४. मला भावलेले स्वातंत्र्यवीर सावरकर ५. जातीभेद निर्मुलन ६. अंदमानातील सावरकरांचे क्रांतिकार्य ७. सावरकर घराण्यातील स्त्रियांचे योगदान ८. अवयव दान ९. आरोग्यधनसंपदा१०. माझ्या कल्पनेतील स्वच्छ भारत ११. प्रदूषणाचा भस्मासुर १२. कधी संपणार भ्रष्टाचार १३. डिजिटल क्रांती १४. नौदल सामर्थ्य १५. अवकाश दर्शन.
शालेय गटातील स्पर्धकांकडून प्रत्येकी ५०/- रूपये आणि महाविद्यालयीन व खुल्या गटातील स्पर्धकांकडून ८०/- रूपये शुल्क आकारण्यात येईल. स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर चित्र काढावे. स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धकाला चित्र काढण्यासाठी कागद दिला जाईल. चित्रकलेसाठी लागणारे इतर साहित्य स्पर्धकाने आणावे.”
“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण स्मृति वर्षानिमित्त लहानग्यांना आणि तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेऊन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक २७ जानेवारी २०१९ ला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजीपार्क, दादर, मुंबई येथे होणार आहे. मुंबई आणि राज्यभरातील नामांकित शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.