Homeटॉप स्टोरीपिता-पुत्राच्या कोठडी मृत्यूप्रकरणी...

पिता-पुत्राच्या कोठडी मृत्यूप्रकरणी ९ पोलिसांना फाशीची शिक्षा!

देशाला हादरवून सोडणाऱ्या तमिळनाडूतील ‘जयराज आणि फेनिक्स’ कोठडी मृत्यू प्रकरणात मदुराई येथील विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणी दोषी ठरलेल्या नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कायद्याचे रक्षकच जेव्हा अमानुष भक्षक बनतात, तेव्हा त्यांना कठोरतम शिक्षा मिळणे गरजेचे आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला.

हे हृदयद्रावक प्रकरण जून २०२०मधील आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात सात्तानकुलम पोलिसांनी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स (फेनिक्स) यांना रात्री उशिरापर्यंत दुकान उघडे ठेवल्याच्या क्षुल्लक कारणावरून ताब्यात घेतले होते. कोठडीत असताना या पिता-पुत्राला पोलिसांनी अत्यंत क्रूर आणि अमानवीय पद्धतीने मारहाण केली होती. या अमानुष छळामुळे गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले होते आणि ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’च्या धर्तीवर भारतात ‘जस्टिस फॉर जयराज-फेनिक्स’ ही मोहीम सोशल मीडियावर जोरात चालली होती.

या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला असून, तपासादरम्यान पोलिसांनी केलेले अत्याचार आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न न्यायालयात सिद्ध झाले. सीबीआयने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबानीवरून न्यायालयाने या नऊ पोलिसांना हत्त्येच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले. कोठडीतील मृत्यू (कस्टोडियल डेथ) प्रकरणात एकाचवेळी नऊ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याची ही देशातील दुर्मिळ घटना मानली जात आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला पाच वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर न्याय मिळाला असून, यामुळे पोलिसांच्या मनमानी कारभाराला मोठा चाप बसण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...

इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू! तात्पुरत्या युद्धविरामाला नकार!!

इराणच्या सुरक्षायंत्रणेला सोमवारी मोठा हादरा बसला आहे. रिव्होल्युशनरी गार्ड्सचे (आयआरजीसी) गुप्तचर प्रमुख मजीद खादेमी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले असून, यामुळे इराणच्या लष्करी नेतृत्त्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खादेमी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी,...

सुनेत्रा पवारांनी केला प्रचाराचा शंखनाद

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत सोमवारी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे सुपूर्द केला. या अर्जाद्वारे त्यांनी बारामतीच्या राजकीय रिंगणात आपली दावेदारी निश्चित केली असून, यावेळी समर्थकांमध्ये मोठा उत्साह...
Skip to content