Homeब्लॅक अँड व्हाईटतस्करी केलेली 50...

तस्करी केलेली 50 मेट्रिक टन सुपारी जप्त, पाच अटकेत!

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) एका अनोख्या पद्धतीचा छडा लावला आहे ज्यामध्ये बंदरातून कंटेनर मालवाहतूक स्थानकापर्यंत (सीएफएस) कंटेनर वाहतुकीदरम्यान कागदोपत्री नोंद केलेल्या वेष्टित मालात कंटेनरमध्ये भरलेला सुपारीचा नोंद न केलेला माल बदलून सुपारीची तस्करी केली जात होती. तस्करी करणाऱ्या टोळीवर केलेल्या या मोठ्या कारवाईत, डीआरआयने पाच जणांना अटक केली आहे आणि 50 मेट्रिक टनापेक्षा जास्त सुपारी जप्त केली आहे, ज्याची भारतात अवैधरित्या तस्करी होत होती.

अशी दोन वेगळी प्रकरणे होती, ज्यात महसूल गुप्तचर संचालयाच्या तपासनीसांनी संयुक्त अरब अमिरातीतील दुबई मधून येणारे कंटेनर अडवून 50 मेट्रिक टनाहून अधिक सुपारी जप्त केली.

पहिल्या प्रकरणात, विशिष्ट गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालयाने संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई येथून पाठवलेला 40 फूट कंटेनर अडवला, ज्यात आयात मालाची “चुनखडी” म्हणून कागदोपत्री नोंद करण्यात आली होती. कंटेनरची सखोल तपासणी करण्यात आली आणि 25.9 मेट्रिक टन (अंदाजे) सुपारी खांडाच्या स्वरूपात आढळून आली. 2.23 कोटी (अंदाजे) रुपये किमतीची 25.9 मेट्रिक टन वजनाची सुपारी सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आली.

दुसऱ्या प्रकरणात, डीआरआयने संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथून पाठवलेला 40 फूट कंटेनर अडवला ज्यात आयात मालाची “जिप्सम पावडर” म्हणून कागदोपत्री नोंद करण्यात आली होती. सखोल तपासणीत असे दिसून आले की संपूर्ण मालाची चुकीची नोंद करण्यात आली होती आणि आत सापडलेला माल म्हणजे तागाच्या गोणीत भरलेली अख्खी सुपारी (पोफळी) होती. तपासणीत आढळून आलेली एकूण 2.2 कोटी रुपये (अंदाजे) किमतीची 25.8 मेट्रिक टन (अंदाजे) सुपारी सीमा शुल्क कायदा 1962 च्या तरतुदीनुसार जप्त करण्यात आली.

तपासाच्या आधारे, पहिल्या प्रकरणातील आयईसी धारकासह दोन जणांना अटक करण्यात आली. मात्र, आणखी काही कंटेनरमधून अशीच तस्करी झाल्याचे अधिक तपासात उघड झाले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची शहानिशा आणि कसून चौकशी केल्यावर असे दिसून आले की आणखी दोन कंटेनरमधील सुपारीची तस्करी चुकीची कागदपत्रे सादर करून आणि बंदरातून कंटेनर मालवाहतूक स्थानकापर्यंत (सीएफएस) कंटेनर वाहतूकी दरम्यान वेष्टित (चुनखडी) मालाच्या जागी कंटेनरमध्ये भरलेली सुपारी ठेवण्यात आली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत आणखी तीन जणांना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सुपारी तस्करीची संपूर्ण प्रक्रिया उघड केली.

तस्करी करणाऱ्या टोळीवर केलेल्या या मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने एकूण पाच जणांना अटक केली आहे आणि 50 मेट्रिक टन पेक्षा अधिक सुपारी जप्त केली आहे. तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात आणि वरील प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना पकडण्यात डीआरआयचा सखोल तपास आणि यश हे तस्करीविरुद्ध सुरू असलेल्या लढाईसाठी डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे द्योतक आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content