Homeब्लॅक अँड व्हाईटफसवणूक करणाऱ्या 461...

फसवणूक करणाऱ्या 461 बनावट कंपन्यांचा पर्दाफाश!

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महासंचालनालयाच्या  गुरुग्राम क्षेत्रीय विभागाने अलीकडे 461 बनावट कंपन्यांचा सहभाग असलेले एक मोठे फसवे आयटीसी अर्थात इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघडकीस आणले आहे. 863 कोटी रुपयांच्या अवैध आयटीसी मंजुरीचे हे प्रकरण आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन प्रमुख हस्तकांना अटक झाली आहे.

गैरव्यवहार करण्यासाठी गुप्त कार्यालयाविषयीची खबर गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर शोध घेण्यात आला तेव्हा या फसवणुकीचा छडा लागला. या कार्यालयात सापडलेल्या लॅपटॉपमध्ये भाडे करार, वीजबिल, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रांच्या बनावट सॉफ्ट कॉपीज आढळून आल्या. या कार्यालयातून जप्त करण्यात आलेले लॅपटॉप, उपकरणे यांच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर कारवाई करण्यात आली. धातू/लोह आणि पोलाद क्षेत्रात जिथे मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी होते त्या क्षेत्रात हे बनावट आयटीसी पोहोचले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content