Homeएनसर्कलग्लोबल मेरिटाइम इंडिया...

ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिटचा तिसरा रोड शो संप्पन्न!

जगभरातील सागरी उद्योगातील नेते, सरकारी अधिकारी, खलाशी आणि भागधारकांना एकत्र आणणारा एका भव्य उत्सव “जागतिक सागरी दिन 2023” आणि ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट (GMIS)- 2023 निमित्ताने आयोजित तिसरा रोड शो नुकताच संयुक्तपणे साजरा करण्यात आला. आधुनिक स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या हा कार्यक्रम भारताच्या सागरी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाईल.

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (IMO) 2023 या वर्षासाठी निवडलेल्या MARPOL at 50 – Our commitment goes on मारपोल अॅट 50 आमची वचनबद्धता कायम आहे या संकल्पनेनुसार आयोजित या कार्यक्रमाने, भारताच्या शाश्वत नौवहन पद्धतींबद्दलची वचनबद्धता सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले.

भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि एनएमडीसीच्या केंद्रीय समितीचे उपाध्यक्ष कॅप्टन बी.के. त्यागी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांनी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले आणि या दिवसाच्या महत्त्वाविषयी माहिती दिली. यावेळी त्यागी यांनी ग्लोबल मेरिटाइम इंडिया समिट (GMIS)-2023च्या तयारीचीही तपशीलवार माहिती दिली, ज्यामध्ये जगभरातील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या जहाजांचा सहभाग होता.

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे सरचिटणीस श्री. किटॅक लिम यांच्या हृदयस्पर्शी व्हिडिओ संदेशाने, शाश्वतग्रहासाठी तांत्रिक आणि हरित संक्रमणामध्ये मानवी घटकाला आघाडीवर ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय आणि आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी सागरी परिसंस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय सामर्थ्यावर आपला विश्वास व्यक्त केला. मुंबईत 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान नियोजित, जीएमआयएस-2023, परिषदेमध्ये भारताची प्रगती दाखवण्याच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी त्यांनी सर्व सागरी उद्योग भागधारकांना आवाहन केले. शिपिंगचे उपमहासंचालक अश मोहम्मद यांनी जीएमआयएस-2023,परिषदेसाठी केलेल्या सूक्ष्म व्यवस्थेचे सादरीकरण केले.

या उत्सवाचा एक भाग म्हणून, भारतीय शिपिंग रजिस्टरचे व्यवस्थापकीय संचालक विजय अरोरा यांनी या वर्षीच्या संकल्पनेवर आधारित चर्चासत्राचे अध्यक्षपद भूषवले. डॉ. रजनीश कुमार, कॅप्टन तुषार प्रधान आणि मुदित मेहरोत्रा ​​यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञ, यांनी यावेळी शाश्वत सागरी नौवहन पद्धतींवर चर्चा केली. नेदरलँड्सच्या राज्याचे महावाणिज्य दूत, बार्ट डी जोंग, यांनी डीकार्बोनायझेशनवर लक्ष केंद्रित करून मारपोल MARPOL परिषदेचे महत्त्व आणि त्याच्या विकसित होत असलेल्या नियामक आराखड्यावर भर दिला. प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी भागीदारी आणि सहकार्याच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला.

आर. लक्ष्मणन, आयएएस, सहसचिव (अंतर्देशीय जलमार्ग वाहतूक, प्रशासन आणि समन्वय, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, नवी दिल्ली), यांनी जागतिक स्तरावर सागरी क्षेत्रात भारताची उत्कृष्टता दाखवून, जीएमआयएस परिषदेसाठी भारताची उपलब्धी आणि तयारी विषयी माहिती दिली.

श्याम जगन्नाथन, आयएएस, शिपिंग महासंचालक आणि एनएमडीसीच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष, यांनी भारताच्या सागरी प्रगतीबद्दल अंतर्दृष्टी सामायिक केली, ज्यात मेरीटाइम इंडिया व्हिजन-2030 समाविष्ट आहे. त्यांनी भारतातील मारपोल(MARPOL) परिषदेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक रोडमॅप तयार केला आणि जीएमआयएस परिषदेमध्ये भारताच्या सागरी विकासाचे साक्षीदार होण्यासाठी भागधारकांना आमंत्रित केले.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content