Homeब्लॅक अँड व्हाईट30 कोटी रुपयांची...

30 कोटी रुपयांची 34 महागडी घड्याळे जप्त!

तस्करी करून देशात आणलेली 30 कोटी रुपये किमतीची महागडी घड्याळे, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ताब्यात घेतल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

डीआरआयच्या मुंबई विभागीय पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एका व्यक्तीच्या निवासी परिसरात 30 पेक्षा जास्त महागडी परदेशी घड्याळे ठेवलेली होती. सदर व्यक्ती परदेशी गेला असून भारतात परत येताना कोणतेही शुल्क न भरता अशाच प्रकारची महागडी, परदेशी घड्याळे आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती विभागाला मिळाली.

या गोपनीय माहितीच्या आधारे, विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंगापूरहून कोलकाता येथे आलेल्या या प्रवाशाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे ग्र्युबेल फोर्सी या अत्यंत महागड्या ब्रँडचे एक घड्याळ सापडले. त्याने या घड्याळाची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांपासून लपवली होती. या प्रवाशाला सीमा शुल्क कायदा 1962 मधील कलम 104 अंतर्गत अटक करण्यात आली.

त्यानंतर, या प्रवाशाच्या प्रतिष्ठित निवासी संकुलातील रहिवासी परीसरावर डीआरआयच्या मुंबई विभागीय पथकातील अधिकाऱ्यांनी छापा घालून राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये ग्र्युबेल फोर्सी, पर्नेल, लुई व्हीतों, एमबी अँड एफ, मॅड, रोलेक्स, ऑडमार्स पीजाँ, रिचर्ड मिले इत्यादी परदेशी ब्रँडची 34 अत्यंत महागडी घड्याळे ताब्यात घेण्यात आली. यापैकी अनेक घड्याळे अत्यंत उच्च किंमत असलेली लिमिटेड एडिशन प्रकारची घड्याळे आहेत. या सर्व घड्याळांची बाजारातील एकूण किंमत 30 कोटी रुपयांहून अधिक आहे.

परदेशाहून येताना सामानात घड्याळे आणल्यास त्यांच्या किंमतीवर सामानविषयक नियमांनुसार 38.5% सीमा शुल्क भरावे लागते. उपरोल्लेखित व्यक्तीने हे शुल्क न भरता देशात घड्याळे आणल्याचे निदर्शनास आले आहे.

या कारवाईमुळे अनेकदा परदेश वाऱ्या करून त्या माध्यमातून केलेला गंभीर स्वरूपाचा घोटाळा उघडकीस आला असून त्यातून तस्करीच्या वैशिष्ट्यपूर्ण तसेच अत्याधुनिक पद्धती शोधून काढून गुन्हेगारांना पकडण्याची डीआरआयच्या अधिकाऱ्यांची क्षमता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content