Homeबॅक पेजअज्ञानामुळे गेलेले ३...

अज्ञानामुळे गेलेले ३ लाख पोलिसांमुळे मिळाले परत!

अज्ञानामुळे झालेल्या चुकीमुळे तीन लाखांना फसविल्या गेलेल्या एका व्यक्तीला मुंबईतल्या दहिसर पोलिसांनी त्यांचे पैसे परत मिळवून देण्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

या घटनेची थोडक्यात हकीकत अशी. अभय नवीनचंद्र कामानी (वय 42 वर्षं) नावाची नोकरदार व्यक्ती दहिसर पूर्व येथील मराठा कॉलनीत राहतात. कामानी 31 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या दोन मुलींना बोरीवलीच्या मेरी मॅक्युलेट हायस्कूल शाळेत सोडून येत असताना त्यांच्या मोबाईल फोनवर आयसीआयसीआय बँकेकडून क्रेडिट कार्ड व्हिडिओ केवायसी अपडेट करण्यासाठी एक संदेश प्राप्त झाला होता. तो तक्रारदार कामानी यांनी उघडून पाहिला असता त्यांना त्यामध्ये एक लिंक दिसली. त्यावर त्यांनी क्लिक करत असताना त्यांना मोबाईल क्रमांक 9883681241 यावरून कॉल आला. तो कामानी यांनी उचलला असता ‘मी आयसीआयसीआय बँकेकडून बोलत आहे. तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे. तुमच्या मोबाईलवर जो संदेश प्राप्त झाला, त्यावर जाऊन क्लिक करा..’ असे सांगितले.

त्यानंतर कामानी यांनी नमूद संदेशामधील लिंकवर क्लिक केले असता तक्रारदाराच्या मोबाईल क्रमांकावर एका पाठीमागे एक असे 05 ते 10 ओटीपी संदेश प्राप्त झाले. त्यानंतर थोड्या वेळात त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या क्रेडिट कार्डमधून 65,490 रू. कट झाल्याचा संदेश प्राप्त झाला. नंतर एका पाठीमागे एक असे 19,560 रू, 84,145 रू, 49,999 रू, 83,997रू, असे एकूण 3,03,194 रू त्यांच्या क्रेडिट कार्डमधून कपात झाले. कामानी यांना वरील रक्कम डेबिट झाल्याचा संदेश मिळताच, त्यांना स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ दहिसर पोलीस ठाण्यातील सायबर सेल येथे उपनिरीक्षक गुहाडे यांच्याकडे तक्रार केली.

पोलिसांनी तक्रारदाराच्या गेलेल्या रक्कमेचा शोध घेतला असता त्यांची रक्कम

1) REALME MOBILE- 83,997 रू,

2) ONE PLUS 49,999 रू, 

3) INFINITY RETAIL 65,490 रू,

4) MOBIKWIK 19,560 रू,

5) OPPO MOBILES 84,148 रू, 

येथे गेल्याचे समजले. त्यानंतर उपनिरीक्षक गुहाडे यांनी वरील कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांना  मेलद्वारे व मोबाईलवर संपर्क करून फॉलोअप घेऊन तक्रारदाराचे 3,03,194/- त्यांना परत मिळवून दिले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त (परिमंडळ- 12) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (दहिसर विभाग) किशोर गायके, दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक राम पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेश गुहाडे यांच्या पथकाने हा तपास केला.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content