Homeएनसर्कलपुढच्या महिन्यात २१...

पुढच्या महिन्यात २१ दिवस बँकहॉलिडे!

बँकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा ऑक्टोबर, रजेसाठी लयलुटीचा महिना असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत यादीप्रमाणे देशातल्या विविध भागात मिळून ऑक्टोबर २०२१, या महिन्यातले तब्बल २१ दिवस बँकेच्या कर्मचाऱ्यांना सुट्टीचा आनंद लुटता येणार आहे. यामध्ये १४ दिवस विविध कारणांसाठी असलेल्या सुट्ट्या तसेच उरलेले सात दिवस दुसरा व चौथा शनिवार तसेच रविवार असणार आहे.

धार्मिक, सणासुदीच्या रजा, राज्यस्तरीय उत्सव आदींचा रजांच्या कारणांमध्ये समावेश आहे. हॉलिडे अंडर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट एक्ट, रिअल टाईम ग्रोस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोझिंग अकाऊंट्स, आदी कायद्याखाली या रजा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक राज्यानुसार या रजांचे आकडे बदलत असले तरी महाराष्ट्रात नियमित रजांसह १० दिवस बँका सर्नसामान्य ग्राहकांसाठी बंद असतील.

ही आहे बँकांच्या सुट्टीची यादी-

  • १ ऑक्टोबर- अर्धवार्षिक क्लोझिंग ऑफ बँक अकाऊंट्स (गंगटोक)
  • २ ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती (देशभर)
  • ३ ऑक्टोबर- रविवार
  • ६ ऑक्टोबर- महालय (सर्वपित्री) अमवास्या (आगरतळा, बेंगळुरू व कोलकाता)
  • ७ ऑक्टोबर- मेरा चाओरेन हॉबा ऑफ लायनिंग्थू सन्माही (इम्फाळ)
  • ९ ऑक्टोबर- दुसरा शनिवार
  • १० ऑक्टोबर- रविवार
  • १२ ऑक्टोबर- दुर्गा पूजा (महा सप्तमी) (आगरतळा, कोलकाता)
  • १३ ऑक्टोबर- दुर्गा पूजा (महा अष्टमी) (आगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोलकाता, पाटना, रांची)
  •  १४ ऑक्टोबर- दुर्गा पूजा/दसरा (महा नवमी)/आयुथा पूजा (आगरतळा, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ, पाटना, रांची, शिलाँग, श्रीनगर, थिरूवनंथपुरम)
  •  १५ ऑक्टोबर- दुर्गा पूजा/दसरा (विजयादशमी) (इम्फाळ व शिमला वगळता इतरत्र देशभर)
  •  १६ ऑक्टोबर- दुर्गा पूजा (दसैन) (गंगटोक)
  •  १७ ऑक्टोबर- रविवार
  •  १८ ऑक्टोबर- कटी बिहू (गुवाहाटी)
  •  १९ ऑक्टोबर- ईद-ए-मिलाद (ईद-ए-मिलादुन्नबी) (अहमदाबाद, बेलापूर, भापाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर, थिरूवनंथपूरम)
  •  २० ऑक्टोबर- महर्षि वाल्मिकी जयंती/लक्ष्मी पूजा/ईद-ए-मिलाद (आगरतळा, बेंगळुरू, चंदीगढ, कोलकाता व शिमला)
  •  २२ ऑक्टोबर- ईदनंतरचा शुक्रवार (जम्मू, श्रीनगर)
  •  २३ ऑक्टोबर- चौथा शनिवार
  •  २४ ऑक्टोबर- रविवार
  •  २६ ऑक्टोबर- एक्सेशन डे (जम्मू, श्रीनगर)
  •  ३१ ऑक्टोबर- रविवार

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content