Homeकल्चर +पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट...

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आले १५७४ चित्रपट!

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २१वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी काल एका पत्रकार परिषदेत केली. यावर्षी महोत्सवासाठी ७२ देशांमधून १५७४ इतके चित्रपट आले असून त्यापैकी १४० चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आणि चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, पुणे फिल्म फाऊंडेशनचे विश्वस्त सबिना संघवी, सतीश आळेकर, मोहन आगाशे आणि महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत महोत्सव असल्याने आम्ही त्यासाठी आर्थिक मदतीसोबतच इतरही सर्व प्रकारची मदत करू असे आश्वासन डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी महोत्सव हा केवळ चित्रपटगृहात अर्थात ऑफलाईन पद्धतीने होणार असून यावर्षीच्या महोत्सव पाहण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया गुरुवार ५ जानेवारी रोजी www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर तर चित्रपटगृहांबाहेरील स्पॉट नोंदणी प्रक्रिया १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) या तीन ठिकाणी एकूण ९ पडद्यांवर महोत्सवाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार असल्याचेही पटेल यांनी यावेळी नमूद केले.

महोत्सवात दाखविण्यात येणारे सर्व चित्रपट हे ‘ए प्लस ग्रेड’चेच आहेत असे सांगत डॉ. जब्बार पटेल म्हणाले की, यावर्षी जानेवारी महिन्यात नियोजित असलेला महोत्सव आम्ही प्रशासनाच्या विनंतीला मान देत फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे ठरविले आहे. आधीच्या तारखांदरम्यान नेमकी जी-२० परिषदसंबंधी बैठका पुण्यात होणार होत्या. या दरम्यान सेनापती बापट रस्त्यांवरील पॅव्हेलियन मॉलमध्ये महोत्सवाच्या ६ स्क्रीन्स होत्या. याठिकाणी प्रशासनावरील ताण आणखी वाढू नये म्हणून आम्ही प्रशासनाच्या विनंतीचा स्वीकार करीत तारखा पुढे ढकलल्या.

सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठीचे नोंदणी शुल्क रुपये ८०० इतके असून ज्येष्ठ नागरिक, चित्रपट क्लब सदस्य व विद्यार्थी यासाठी हे शुल्क रु. ६०० इतके आहे. महोत्सवासाठी निवड झालेल्या व जागतिक स्पर्धा विभागात १४ चित्रपटांची घोषणादेखील यावेळी करण्यात आली.    

२१व्या पिफसाठी जागतिक स्पर्धा विभागात निवड झालेले चित्रपट–

क्लॉन्डाईक (दिग्दर्शक – मेरीयन एर गोर्बेक, युक्रेन, टर्की)

परफेक्ट नंबर (दिग्दर्शक – क्रिस्तोफ झानुसी, पोलंड)

थ्री थाऊजंड नंबर्ड पिसेस (दिग्दर्शक – ऍडम चाशी, हंगेरी)

द ब्लू काफ्तान (दिग्दर्शक – मरियम तजनी, मोरोक्को, फ्रांस, बेल्जियम, डेन्मार्क)

मेडीटेरियन फिव्हर (दिग्दर्शक – महा हाज, पॅलेस्टीन, जर्मनी, फ्रांस, कतार)      

एविकष्ण (दिग्दर्शक – मेट फजॅक्स, हंगेरी)

मिन्स्क (दिग्दर्शक – बोरिस गट्स, एस्टोनिया)

वर्ड (दिग्दर्शक – बीएता पाकानोव्हा, चेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया, पोलंड)

बटरफ्लाय व्हिजन (दिग्दर्शक – मॅक्सिम नकोनेखनी, युक्रेन, क्रोशिया, स्वीडन, चेक रिपब्लिक)

तोरी अँड लोकिता (दिग्दर्शक – जीन-पेरे अँड ल्युक दादेन, बेल्जियम, फ्रांस)

अवर ब्रदर्स (दिग्दर्शक – रशीद बुशारब, फ्रांस)

व्हाईट डॉग (दिग्दर्शक – अनायस बाहबुह – लाव्हलेट, कॅनडा)

बॉय फ्रॉम हेवन (दिग्दर्शक – तारिक सालेह, स्वीडन, फिनलँड, फ्रांस, डेन्मार्क)    

हदिनेलेंतू (दिग्दर्शक – प्रीथ्वी कोनानूर, भारत)

Continue reading

‘जीनोम सिक्वेन्सिंग’मुळेच रत्नागिरीतला हापूस पोहोचला सातासमुद्रापार!

जगप्रसिद्ध जीनोम शास्त्रज्ञ जे. क्रेग वेंटर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ जागतिक विज्ञान क्षेत्राचीच हानी झाली नाही, तर कोकणच्या आणि पर्यायाने भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला 'डिजिटल' ताकद देणारा एक आधारवड हरपला आहे. वेंटर यांनी विकसित केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग...

डिजिटल लॉकर सुविधा असलेली ॲक्सिस बँकेची पहिली शाखा कार्यरत

भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने नवी दिल्लीतल्या कॅपिटल ग्रीन, डीएलएफ मिडटाउन प्लाझा येथे डिजिटल लॉकर सेवांवर लक्षकेंद्रित करणारी आपली पहिली शाखा नुकतीच सुरू केली. प्रगत स्वयंचलित प्रणाली (ऑटोमेशन), उत्कृष्ट सुरक्षाव्यवस्था आणि अत्याधुनिक लॉकर सेवांच्या...

मिसिंग लिंकवर सेल्फी काढाल तर पावती फाटेल मोठ्या दंडाची!

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हणजेच यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो घेण्यासाठी वाहनचालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रूतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून अशाप्रकारे वाहन थांबवणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या दंडाला सामोरे जावे...
Skip to content