Homeएनसर्कलमहामार्गांच्या भूसंपादनाचे 1467...

महामार्गांच्या भूसंपादनाचे 1467 प्रकल्प भूमी राशी पोर्टलखाली!

भारतातील महामार्ग पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी तसेच भूसंपादनाची नुकसानभरपाई देण्यासाठी, भूसंपादनाच्या अधिसूचनांच्या ऑनलाईन प्रक्रिया एकाच प्लॅटफॉर्म वर करता याव्यात, यासाठी भूमी राशी पोर्टल तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) 1467 प्रकल्प भूमी राशी पोर्टल अंतर्गत आणण्यात आले आहेत. 1 एप्रिल 2018 पासून, भूसंपादनाशी संबंधित सर्व प्रस्ताव या पोर्टलवरुन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

भूसंपादनासाठी, सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या राज्य सरकारच्या संबंधित महसूल अधिकाऱ्याद्वारे सर्व भूसंपादनाच्या सूचना ऑनलाईन सादर केल्या जातात आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मान्यतेनंतर त्या ई-राजपत्राद्वारे भारत सरकारच्या प्रसारमाध्यमांना ऑनलाईन पाठवल्या जातात. भूसंपादनाची नुकसानभरपाईही भूमी राशी पोर्टलद्वारे दिली जात आहे. पोर्टलमुळे अधिसूचना जारी करण्याचा कालावधी कमी झाला असून, संपूर्ण प्रक्रियेत कार्यक्षमता तसेच पारदर्शकता आणली आहे.

या प्रकल्पांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. https://bhoomirashi.gov.in/auth/revamp/search_proj.cshtml 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content