Homeबॅक पेजयंदा हज यात्रेकरूंसाठी...

यंदा हज यात्रेकरूंसाठी 1,40,020 जागा राखीव!

हज 2024साठी भारतातून एकूण 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला असून भारतीय हज समितीच्या माध्यमातून जाण्यासाठी यात्रेकरूंच्या 1,40,020 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे 2024 वर्षात हज यात्रेला पहिल्यांदाच जाणार असलेल्या सर्वसाधारण यात्रेकरूंना मोठा फायदा होईल, तर  35,005 यात्रेकरूंना हज समुहाच्या परिचालकांद्वारे हजयात्रा करण्याची परवानगी दिली जाईल.

केंद्रीय महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री  स्मृती इराणी यांच्यासमवेत परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री  व्ही. मुरलीधरन यांनी, सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री, डॉ. तौफिक बिन फवजान अल-रबिया यांच्यासह, सौदी अरेबियात जेद्दाह इथे द्विपक्षीय हज करार 2024वर नुकतीच स्वाक्षरी केली.

लेडीज विदाऊट मेहरम (LWM) श्रेणी  अंतर्गत सहभागास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राबवलेल्या उपक्रमाची यावेळी  चर्चा झाली, तसेच या उपक्रमाचे मनापासून  कौतुक करत वाहवा केली गेली. द्विपक्षीय हज करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आणि सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर,स्मृती इराणी यांच्यासोबत मुरलीधरन यांनी, जेद्दाहच्या किंग अब्दुल अझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हज टर्मिनलला भेट दिली. हज यात्रेकरूंच्या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी आणि भारतीय हज यात्रेकरुंच्या सोयीसाठी उत्तम मालवाहतूक तसेच देखरेख यंत्रणा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही भेट होती.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content