Homeब्लॅक अँड व्हाईटदर्जाहीन प्रेशर कुकर...

दर्जाहीन प्रेशर कुकर विकल्याबद्दल ‘क्लाऊडटेल’ला 1 लाखाचा दंड!

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (सीसीपीए) आदेशाला आव्हान देणारी क्लाऊडटेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची याचिका राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (एनसीडीआरसी) फेटाळली आहे. ग्राहकांना घरगुती प्रेशर कुकर विकण्यासाठी अनिवार्य असलेल्या बीआयएस मानकांचे उल्लंघन करून कंपनीने ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, सीसीपीएने हे आदेश जारी केले. कंपनीने गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे (क्यूसीओ) उल्लंघन आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करून प्रेशर कुकरची विक्री केल्याबद्दल रुपये 1,00,000 इतका दंड भरावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.    

या आदेशानुसार, संबंधित कंपनीने ग्राहकांना विकलेले घरगुती प्रेशर कुकरचे 1,033 नग परत घ्यावेत, परत मागवलेल्या प्रेशर कुकरच्या किमतीची ग्राहकांना परतफेड करावी, आणि याबाबतचा अनुपालन अहवाल 45 दिवसांच्या आत सादर करावा, असे निर्देश सीसीपीएने दिले आहेत.

क्लाउडटेल इंडिया प्रा. ली. ही “अमेझॉन बेसिक्स स्टेनलेस स्टील आऊटर लीड प्रेशर कुकर, 4 लिटर या (शिट्टीद्वारे कुकरमधील हवेच्या दाबाची सूचना न देणारा)” प्रेशर कुकरची विक्री करणारी कंपनी आहे. हा प्रेशर कुकर पुढील युआरएल वर अमेझॉन ई-कॉमर्स व्यासपीठावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता: https://www.amazon.in/AmazonBasics-Stainless-Steel-Pressure-Cooker/dp/B071G5KNXK

दिनांक 01.02.2021 रोजी लागू झालेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशांनुसार, घरगुती प्रेशर कुकरना भारतीय मानक (IS) 2347: 2017 चे पालन करणे बंधनकारक आहे, आणि भारतीय मानक ब्यूरोच्या (अनुरूपता मूल्यांकन ) नियंत्रण, 2018 च्या अनुसूची II च्या योजना-I नुसार भारतीय मानक ब्यूरोच्या (BIS) परवान्याखाली मानकचिन्ह धारण करणे बंधनकारक आहे.

संबंधित प्रकरणात, क्लाउडटेल कंपनी विहित अनिवार्य मानकांचे पालन न करता आणि BIS च्या परवान्याखाली मानक (ISI) चिन्हाशिवाय ग्राहकांना घरगुती प्रेशर कुकर विकत असल्याचे आढळून आले. गुणवत्ता नियंत्रण आदेश लागू झाल्यानंतरही क्लाउडटेलद्वारे भारतातील ग्राहकांना अ-प्रमाणित प्रेशर कुकर विकले जात होते. क्लाउडटेलने सीसीपीएला दिलेल्या उत्तरात असे म्हटले होते की गुणवत्ता नियंत्रण आदेश लागू झाल्यानंतर त्यांनी प्रेशर कुकरची आयात थांबवली होती. मात्र, आयात थांबवल्यानंतरही कंपनीने ग्राहकांना असे प्रेशर कुकर विकणे थांबवले नव्हते, असे सीसीपीएच्या निदर्शनास आले. खरे तर, गुणवत्ता नियंत्रण आदेशाबद्दल माहिती असूनही, कंपनी  ग्राहकांना असे प्रेशर कुकर मोठ्या प्रमाणात विकत असल्याचे स्पष्ट आढळून आले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content