HomeArchive२०२२च्या आधी तयार...

२०२२च्या आधी तयार होणार समृद्धी महामार्ग – एकनाथ शिंदे

Details
२०२२च्या आधी तयार होणार समृद्धी महामार्ग – एकनाथ शिंदे

    21-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
 
मुंबई-नागपूर शहरांना जोडणाऱ्या राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे २० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
 
ठाणे येथील एमएसआरडीसी कार्यालयात समृद्धी महामार्ग प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. समृद्धी महामार्गाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून २०२२ पर्यंत हा संपूर्ण रस्ता बनून तयार होणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी अनेक लोकांनी सहकार्य केले असून कमी वेळात जमीनीचे अधिग्रहण झाले आहे. या संबंधित जमीनीच्या मालकांना योग्य तो मोबदलादेखील देण्यात आला आहे. या महामार्गासाठी स्वतः पुढे होऊन लोकांनी पुढाकार घेतला. या महामार्गात कृषी समृद्धी केंद्र, लॉजिस्टिक, फूड प्रोसेसिंगची केंद्रे उभारले जाणार असून कृषी संबंधित उद्योगांना यामुळे चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. यासाठी ८,३११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गाच्या कामासाठी सर्व विभागाच्या आवश्यक असलेल्या परवानग्या घेण्यात आल्या असून याचे काम सुरू झाले आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी आता लागत असलेल्या १६ तासाच्या निम्म्या वेळेत म्हणजे ७ तासत मुंबई गाठता येणार आहे, असे ते म्हणाले.
 
काय आहे सम्रुद्धी महामार्ग प्रकल्प?
 
 
समृद्धी महामार्ग हा नागपूर ते ठाणे असा ७०० किलोमीटरचा हा संपूर्ण नवा महामार्ग असणार आहे. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. आता मुंबईहून नागपूरला पोहोचायला सरासरी १६ तास लागतात. या महामार्गामुळे तो कालावधी निम्म्यावर येणार आहे.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
 
मुंबई-नागपूर शहरांना जोडणाऱ्या राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे २० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
 
“ठाणे येथील एमएसआरडीसी कार्यालयात समृद्धी महामार्ग प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. समृद्धी महामार्गाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून २०२२ पर्यंत हा संपूर्ण रस्ता बनून तयार होणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी अनेक लोकांनी सहकार्य केले असून कमी वेळात जमीनीचे अधिग्रहण झाले आहे. या संबंधित जमीनीच्या मालकांना योग्य तो मोबदलादेखील देण्यात आला आहे. या महामार्गासाठी स्वतः पुढे होऊन लोकांनी पुढाकार घेतला. या महामार्गात कृषी समृद्धी केंद्र, लॉजिस्टिक, फूड प्रोसेसिंगची केंद्रे उभारले जाणार असून कृषी संबंधित उद्योगांना यामुळे चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. यासाठी ८,३११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गाच्या कामासाठी सर्व विभागाच्या आवश्यक असलेल्या परवानग्या घेण्यात आल्या असून याचे काम सुरू झाले आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी आता लागत असलेल्या १६ तासाच्या निम्म्या वेळेत म्हणजे ७ तासत मुंबई गाठता येणार आहे, असे ते म्हणाले.”

 
काय आहे सम्रुद्धी महामार्ग प्रकल्प?
 
 
“समृद्धी महामार्ग हा नागपूर ते ठाणे असा ७०० किलोमीटरचा हा संपूर्ण नवा महामार्ग असणार आहे. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. आता मुंबईहून नागपूरला पोहोचायला सरासरी १६ तास लागतात. या महामार्गामुळे तो कालावधी निम्म्यावर येणार आहे.”

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content