HomeArchiveसौरऊर्जेवरील विश्वव्यापी विश्वप्रार्थना...

सौरऊर्जेवरील विश्वव्यापी विश्वप्रार्थना फलकाचे अनावरण!

Details
सौरऊर्जेवरील विश्वव्यापी विश्वप्रार्थना फलकाचे अनावरण!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
“हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे!” या जीवन विद्या मिशनचे संस्थापक व प्रणेते सद्गुरु डॉ. वामनराव पै यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विश्वप्रार्थनेच्या एक भव्य सौरऊर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उभारलेल्या फलकाचे अनावरण एका शानदार आणि भावभक्तीमय वातावरणात जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाददादा पै यांच्या हस्ते करण्यात आले.

बोरीवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या मुख्य प्रवेशद्वारी उभारण्यात आलेल्या सौरऊर्जेवरील विश्वप्रार्थनेच्या फलक अनावरण समारंभाला प्रल्हाददादा पै यांचे नातू कुमार यश पै आणि स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘पर्यावरण हाच नारायण’ हा विचार प्रत्यक्षात साकारणाऱ्या या विश्वप्रार्थना फलकाची प्रकाशयोजना सौरऊर्जेवर आधारित आहे. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ही विश्व प्रार्थना सर्वांच्या मुखात यावी, हा उदात्त हेतू हा फलक उभारण्यामागे आहे. यासाठी आमदार प्रकाश सुर्वे यांनी आर्थिक सहकार्य केले. तसेच माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे व नगरसेविका आणि प्रभाग समिती अध्यक्षा रिद्धी खुरसुंगे, नगरसेवक संजय घाडी यांचे विशेष सहकार्य लाभले.

याप्रसंगी आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात विश्व प्रार्थनेने केली. हे उत्तम, पवित्र कार्य करावयास मिळाले यासाठी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर प्रल्हाददादा पै यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यावरणाचे रक्षण व्हावे व पर्यावरणातील ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे, असे विचार त्यांनी मांडले. ही विश्वप्रार्थना सर्वांसाठी म्हटल्याने सर्वात प्रथम आपले भले होते. कारण सर्वांमध्ये आपण असतो. म्हणून ही प्रार्थना सतत म्हटली गेली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास जीवन विद्या मिशनचे विश्वस्त गिरीश कलव, संतोष सावंत, तुषार राणे तसेच अनेक नामधारक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी अनंत साठे, रमेश चव्हाण, तुषार खानोलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आनंद राणे यांनी केले. प्रल्हाददादा यांनी स्वतः तसेच आमदार प्रकाश सुर्वे यांनी सर्व उपस्थितांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानून विश्व प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content