HomeArchiveसैन्यात अधिकारी होण्याची...

सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी!

Details

 

 
 
भारतीय संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीतजास्त संख्येने जाता यावे आणि त्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) स्पर्धात्मक परीक्षा आणि मुलाखत यांची तयारी करून घेण्याच्या दृष्टीने पात्र उमेदवारांसाठी औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केली आहे.
 

“या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेशासाठीची पात्रता अविवाहित मुलगा उमेदवार, महाराष्ट्राचा अधिवासी असला पाहिजे. त्याची जन्मतारीख दि. २ जुलै २००३ ते ३१ डिसेंबर २००५ या दरम्यान असावी. तो मार्च/एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेला बसणारा असला पाहिजे आणि जून २०२० मध्ये इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा, अशी आहे.”
 
 
“या उमेदवाराची शारीरिक पात्रता उंची १५७ सेंटीमीटर, वजन ४३ किलोग्राम, छाती न फुगवता ७४ सेंटीमीटर, फुगवून ७९ सेंटीमीटर, दृष्टी चष्मा लावून जास्तीतजास्त ६/९, तसेच रंगांधळेपणा नसावा. त्याला लाल व हिरवा रंग ओळखता आला पाहिजे. सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी तो पात्र असावा, अशी असावी.”
 
 
“सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेशाकरिता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून एप्रिल-मे २०२० मध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे आणि नागपूर केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षा बहुपर्यायी प्रश्नोत्तरांवर आधारित असेल. ही परीक्षा एकूण १५० गुणांची असेल. गणित ७५ गुण, सामान्यज्ञान ७५ गुण असे स्वरूप असून ही परीक्षा इयत्ता आठवी ते दहावीच्या राज्य बोर्ड व सीबीएससीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. प्रत्येक योग्य उत्तराला एक गुण दिला जाईल तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला अर्धा गुण वजा केला जाईल.”
 
 
“सविस्तर माहितीसाठी संस्थेचे www.spiaurangabad.com हे संकेतस्थळ पाहवे. ऑनलाईन अर्ज याच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावर अर्ज भरावा. परीक्षाशुल्क रूपये ४५० असून फक्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे ऑनलाईनच भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलनाद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेशअर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्जासोबत भरलेली प्रवेश शुल्काची रक्कम परत मिळणार नाही.”
 
 
“या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रवेशअर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०२० आहे. लेखी परीक्षेचे हॉलतिकीट दिनांक १५ मार्च २०२० नंतर संस्थेच्या संकेतस्थळावरून प्राप्त करून घेण्यात यावे. लेखी परीक्षेचे हॉलतिकीट प्राप्त न झाल्यास सकाळी १० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत संस्थेच्या ०२४०- २३८१३७० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ७२१८६६८२५० या भ्रमणध्वनी क्रमांकावर सोमवार ते शुक्रवारदरम्यान चौकशी करावी. तरी जास्तीतजास्त उमेदवारांनी संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर्नल (निवृत्त) अमित दळवी यांनी केले आहे.”

Continue reading

मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे पत्रकार अभय मोकाशींचे निधन

इंग्रजी पत्रकारितेत आपल्या शोधपत्रकारितेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे काल, शनिवारी रात्री उशिरा मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगरातील डॉ. अनिता मयेकर यांच्या माऊली इस्पितळात निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षात पदार्पण करण्यास जेमतेम एक तास उरला असताना...

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...
Skip to content