HomeArchiveसुट्टीत विद्यार्थी घेताहेत...

सुट्टीत विद्यार्थी घेताहेत आरोग्याची विशेष काळजी

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“कोव्हिड-१९च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी अधिक वेळ मिळत आहे. कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता विद्यार्थी स्वतःच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेत असल्याचे जागतिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठीची जगातील सर्वात मोठी ऑनलाईन कम्युनिटी ब्रेनलीने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.”
 
“भारतात २२१७ विद्यार्थ्यांनी या सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवला. त्यात ब्रेनलीला आढळले की, कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे ८४.६% विद्यार्थी त्यांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी सध्या जास्त वेळ देत आहेत. घरी असल्यामुळे ६४.३% विद्यार्थी म्हणाले की, त्यांनी आता ते आरोग्याच्या नव्या वेळापत्रकानुसार वागण्याचा प्रयत्न करत आहेत.”
 
“सर्व्हेच्या निष्कर्षात असे आढळून आले की, आरोग्यदायी दिनचर्या आणि जीवनशैली राखण्यासाठी ४०.८% विद्यार्थी त्यांच्या आहाराची काळजी घेत असून सकस आहार घेण्यावर त्यांचा भर आहे. तसेच ३५.६% विद्यार्थी दररोज व्यायाम करत आहेत. एकूण सर्वत्र चांगले व्हावे, ही जाणीव ठेवत ९०.५% विद्यार्थ्यांना शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यही उत्तम राहिले पाहिजे, असे वाटते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ७५.१% विद्यार्थ्यांनी त्यांचे आरोग्य राखण्याचे, स्वच्छता ठेवण्याचे, भविष्यात निरोगी राहण्याचे वचन दिले आहे.”
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content