HomeArchiveसांगलीत काँग्रेसचा खेळखंडोबा!

सांगलीत काँग्रेसचा खेळखंडोबा!

Details
सांगलीत काँग्रेसचा खेळखंडोबा!

    29-Mar-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विकास सावंत
Vikassawant2018@gmail.com
महाराष्ट्राच्या राजकारणात वसंतदादा पाटील दीर्घकाळ ”दादा” राहिले. चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या वसंतदादानी राज्याच्या राजकारणात सांगलीचा मोठा दबदबा निर्माण केला. आणिबाणीनंतर देशभरात काँग्रेसचा पाडाव झाला. स्वतः इंदिराजी पराभूत झाल्या. परंतु वसंतदादांनी सांगलीचा गड राखला व काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला. इंदिराजींच्या हत्त्येनंतर अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस या नात्याने वसंतदादानी, राजीव गांधी यांचे नाव देशाच्या पंतप्रधानपदी सुचवले होते. अनेक वर्षे वसंतदादा पाटील म्हणजे महाराष्ट्राची काँग्रेस पार्टी असे समीकरण होते. त्या वसंतदादांच्या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने लोकसभेची जागा स्वतः न लढवता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना राज्य सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा वसंतदादा सांगलीतून करत असत. राज्यभरातील काँग्रेसचे उमेदवार सांगलीत ठरत. यंदा सांगलीतून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र लोकसभा लढवण्याचा अधिकार काँग्रेसने गमावला आहे. या निवडणुकीत सांगलीची लोकसभेची जागा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी सहयोगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. त्यामुळे निष्ठावंत काँग्रेसजनात असंतोष आहे. वसंतदादांचा विचार व कर्तृत्व पुसण्याचा हा प्रकार आहे असा आरोप करत वसंतदादांचे नातू व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी निषेध म्हणून काँग्रेसच्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीतील राजकीय घडामोडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपवाद वगळता सातत्याने दादा घराण्याने नेतृत्त्व केले आहे. वसंतदादा पाटील, शालिनीताई पाटील, प्रकाशबापू पाटील, मदन पाटील व दादांचे नातू प्रतिक पाटील यानी यापूर्वी दोनवेळा या मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला आहे. प्रतिक पाटील यांना केंद्रात कोळसा राज्यमंत्री तसेच युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली गेली होती. 2014 च्या मोदी लाटेत सांगलीत काँग्रेसचा पराभव झाला. पक्षांतर्गत गटबाजी व मोदी लाटेमुळे हा पराभव झाला असलातरी या मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रतिक पाटील व पृथ्वीराज गुलाबराव पाटील तिकिटासाठी आग्रही होते. राज्य निवड समितीने ही दोन्ही नावे केंद्रीय समितीकडे पाठवली होती. दोघांपैकी कोणालाही तिकीट दिले तर एकदिलाने प्रचार करण्याचा निर्णय झाला होता. तरीही काँग्रेसने हा मतदारसंघ सोडला.

2014 लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला संजयकाका पाटील यांच्या रूपाने लोकसभेची जागा जिंकता आली होती. संजयकाका पाटील पूर्वाश्रमीचे काँग्रेसी नेते होते. मोदी लाटेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची जागा जिंकली. गेल्या पाच वर्षांत संजयकाका यांनी जनतेशी संपर्क ठेवला आहे. अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. तरीही भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादीचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यावेळी तिकिटासाठी दावेदार होते. दिल्लीत तळ ठोकून त्यांनी मिरजेचे आमदार सुरेश खाडे, खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर व जतचे आमदार विलास जगताप, धनगर नेते गोपीचंद पडळकर हे संजयकाका यांच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ही जागा अडचणीची वाटत होती.

पारंपरिक मतदार असलेल्या काँग्रेसला मात्र या जागेवर विजय मिळवणे सोपे होते. तरीही स्वाभिमानी पक्षाला ही जागा दिली गेली. त्यामुळे भाजपचा मार्ग सुकर झाला आहे. शेतकरी संघटनेकडे या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार नाही. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनाही या जागेसाठी आग्रही नाही. त्यांनीही सांगलीऐवजी वर्धा, शिर्डी किंवा दुसरी जागा मागितली होती. सांगली मतदारसंघात शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील गेली दोन-तीन वर्षे लोकसभेची तयारी करत होते. तरूण, युवा, कार्यक्षम नेतृत्त्व व नवा चेहरा म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. प्रतिक यांनीही जोरदार तयारी चालवली होती. या दोन्ही नेत्यांना वगळून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ हेतूतः शेतकरी संघटनेला दिला गेला आहे असा आरोप होत आहे. याविरोधात काँग्रेसजन एकत्र आले असून दादांचे नातू विशाल पाटील यांनी बंडचा झेंडा खांद्यावर घेण्याची तयारी केली आहे. काय होते हे पुढे कळेलच..”
 

Continue reading

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...

‘नीट’ परीक्षेत ‘फिजिक्स’ने केले विद्यार्थ्यांना हैराण!

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात आलेली 'नीट-युजी २०२६' ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा रविवारी देशभरात पार पडली. यंदा साधारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदाचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसा कठीण आणि वेळखाऊ होता. विषयनिहाय...

‘तांदळाची कूटनीती’ वापरत भारताची चीन-अमेरिकेला टक्कर

जागतिक स्तरावर ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक ठरत असलेल्या “क्रिटिकल मिनरल्स”च्या शर्यतीत भारताने आता आफ्रिकेकडे धोरणात्मक पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत केवळ खनिजांसाठी गुंतवणूक करत नाही, तर “तांदळाची कूटनीती” (राईस डिप्लोमसी) वापरत आफ्रिकन देशांशी संबंध...
Skip to content