HomeArchiveसह्याद्रीचा ऱ्हास वेळीच...

सह्याद्रीचा ऱ्हास वेळीच थांबवा – डॉ. मधुकर बाचुळकर

Details
सह्याद्रीचा ऱ्हास वेळीच थांबवा – डॉ. मधुकर बाचुळकर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

डॉ. सई लळीत, कोल्हापूर
[email protected]
तब्बल १२० नद्यांचे उगमस्थान असलेला, प्रचंड जैववैविध्य असलेला सह्याद्री बेसुमार जंगलतोड, उत्खनन यामुळे धोक्यात आला आहे. याकडे वेळीच लक्ष देऊन हा ऱ्हास न थांबवल्यास पर्यावरणाचा आणि अर्थकारणाचा कणा मोडून पडेल. प्रसंगी केरळसारखी नैसर्गिक आपत्तीही कोसळू शकते, असा इशारा पर्यावरणवादी आणि ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी (ता. दोडामार्ग) येथील माऊली मंदिरात ग्लोब ट्रस्टने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. बाचुळकर यांनी विविध छायाचित्रे, नकाशे, तक्ते, आकडेवारी यांच्या स्लाईड शोच्या माध्यमातून दिलेल्या ‘सह्याद्रीतील जैवविविधता : एक अद्भूत वैश्विक वारसा’ या सुमारे दोन तासांच्या व्याख्यानातून पश्चिम घाटाचे पर्यावरणीय, अर्थशास्त्रीय महत्त्व पटवून दिले. डॉ. बाचुळकर यांच्याहस्ते कुंडीतील वनौषधींच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी माहिती उपसंचालक सतीश लळीत, आडाळीच्या सरपंच उल्का गावकर, कोल्हापूर येथील वृत्तछायाचित्रकार अनिल वेल्हाळ उपस्थित होते. ग्लोब ट्रस्टचे पराग गावकर यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. बाचुळकर म्हणाले की, जागतिक तापमानवाढ, वातावरणातील बदल, पाणीटंचाई, अन्नटंचाई हे प्रश्न जगासमोर आ वासून उभे आहेत. या भीषण परिस्थितीला मानवाचा पर्यावरणातील अवाजवी हस्तक्षेप आणि पर्यावरणाचा ऱ्हास कारणीभूत आहे. धृवीय प्रदेशातील बर्फ वितळल्याने समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून जगातील ४७ देशांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील पर्यावरणाच्यादृष्टीने सह्याद्रीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जगातील १७ महाजैवविविधता देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतातील हिमालय, ईशान्य भारत आणि पश्चिम घाट या तीन भागांचा जैवविविधता प्रदेशात समावेश होतो. जगात जैवविविधतेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानल्या गेलेल्या ३५ क्षेत्रांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश आहे आणि हाच भाग सध्या अतिशय धोक्यात आला आहे.

सह्याद्री पर्वतामध्ये १२० नद्या उगम पावतात. या नद्यांवर २०४८ छोटीमोठी धरणे बांधण्यात आली आहेत. सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत, या गरजा ही धरणे भागवतात, असे सांगून डॉ. बाचुळकर म्हणाले की, सह्याद्रीमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड, उत्खनन सुरू असल्याने या भागातील अतिशय समृद्ध अशी जैवविविधता, प्राणीपक्षीजीवन धोक्यात आले आहेच. पण नद्याही संकटात सापडल्या असून त्यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. याचा परिणाम या नद्यांवर अवलंबून असलेल्या भूप्रदेशाच्या पर्यावरणावर आणि अर्थकारणावर होणार आहे. सह्याद्रीतील हे जैववैविध्य टिकविण्यासाठी सर्वांचेच प्रबोधन आणि जागृती होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मानवी विकास आणि पर्यावरणाचा समतोल हे समांतरपणे चालले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

सतीश लळीत यांनी पश्चिम घाटातील सह्याद्रीमधील नैसर्गिक संपदा, प्राणी-पक्षी सृष्टी, जैवविविधता यांचा आणि मानवी जीवनाचा परस्परसंबंध स्पष्ट केला. ते म्हणाले की, ही नैसर्गिक संपत्ती आपणाला वारसा म्हणून मिळाली आहे. आपण तिचे मालक नाही. तिचे जतन, संवर्धन करुन ती पुढील पिढीकडे सुपूर्द करणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ अशी आपली अवस्था झाली आहे. अनास्थेमुळे आपण हा वारसा दिवसेंदिवस गमावत चाललो आहोत. मात्र ही अनास्था परवडणारी नाही. या वारशाचे जतन करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.

प्रास्ताविकात पराग गावकर यांनी व्याख्यानाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाला प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. रूपेश पाटकर, लेखिका डॉ. सई लळीत, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे संजय देसाई, नम्रता देसाई, सतीश घोटगे, उद्योजक प्रवीण गावकर, नंदू गावकर, निवृत्त ऑनररी कॅप्टन मंगेश गावकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.”
 
“डॉ. सई लळीत, कोल्हापूर

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content