HomeArchiveशासकीय योजनांपासून अल्पसंख्याक...

शासकीय योजनांपासून अल्पसंख्याक वंचित नको! हाजी अरफात शेख यांची सूचना

Details
शासकीय योजनांपासून अल्पसंख्याक वंचित नको! हाजी अरफात शेख यांची सूचना

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शासन अल्पसंख्याकांसाठीच्या विविधविकासाच्या योजना राबवित असून या योजनांचा लाभ जास्तीतजास्त गरजूंना मिळायला हवा. कोणताहीगरजू शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व संबंधितांनी अधिकप्रभावीपणे काम करावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचेअध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी उस्मानाबादमध्ये दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांकविभागाचा १५ कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक शेखयांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपामुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संतोष राऊत, नायब तहसिलदार संतोषपाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना हाजी अरफात शेखम्हणाले की, जिल्हयातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्याअल्पसंख्याक योजनांची अद्ययावत माहिती ठेवून योग्य आणि गरजूंना या योजनांचा तत्परतेनेलाभ मिळेल, यादृष्टीने झटून काम करण्याची गरज आहे. योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठीअधिकाऱ्यांनी सर्तक राहून गरजूंपर्यंत योजनेचे लाभ वेळेत पोहोचविण्यावर लक्षद्यावे. काम करत असताना शासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ज्या गोष्टींची गरजआहे, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जरूर सांगाव्यात. त्या नक्कीच पुरविल्या जातील.मात्र, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुध्द आयोगामार्फत कठोर कारवाई करण्यातयेईल. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मानही केलाजाईल.

अल्पसंख्यांक समाजाला केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोग प्रयत्न करत असून यायोजनांचा जास्तीतजास्त लाभ देण्यासाठी व योजनांचा प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीनिधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. पोलीस विभागाने प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजाच्याविरोधात जाणीवपूर्वक काही वाद, विवाद, गुन्हे घडवून आणले जात नाही ना याबाबत सतर्कता बाळगावी.स्थानिक वाद शांततापूर्वक मिटवावेत. ग्रामीण, शहरी, सर्व ठिकाणी सर्व समाजातसलोख्याचे वातावरण अबाधित ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवावे,असेही ते म्हणाले.”
 
“शासन अल्पसंख्याकांसाठीच्या विविधविकासाच्या योजना राबवित असून या योजनांचा लाभ जास्तीतजास्त गरजूंना मिळायला हवा. कोणताहीगरजू शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व संबंधितांनी अधिकप्रभावीपणे काम करावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचेअध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी उस्मानाबादमध्ये दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांकविभागाचा १५ कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक शेखयांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपामुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संतोष राऊत, नायब तहसिलदार संतोषपाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना हाजी अरफात शेखम्हणाले की, जिल्हयातील संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्याअल्पसंख्याक योजनांची अद्ययावत माहिती ठेवून योग्य आणि गरजूंना या योजनांचा तत्परतेनेलाभ मिळेल, यादृष्टीने झटून काम करण्याची गरज आहे. योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीसाठीअधिकाऱ्यांनी सर्तक राहून गरजूंपर्यंत योजनेचे लाभ वेळेत पोहोचविण्यावर लक्षद्यावे. काम करत असताना शासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ज्या गोष्टींची गरजआहे, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जरूर सांगाव्यात. त्या नक्कीच पुरविल्या जातील.मात्र, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुध्द आयोगामार्फत कठोर कारवाई करण्यातयेईल. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मानही केलाजाईल.

अल्पसंख्यांक समाजाला केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोग प्रयत्न करत असून यायोजनांचा जास्तीतजास्त लाभ देण्यासाठी व योजनांचा प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठीनिधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. पोलीस विभागाने प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजाच्याविरोधात जाणीवपूर्वक काही वाद, विवाद, गुन्हे घडवून आणले जात नाही ना याबाबत सतर्कता बाळगावी.स्थानिक वाद शांततापूर्वक मिटवावेत. ग्रामीण, शहरी, सर्व ठिकाणी सर्व समाजातसलोख्याचे वातावरण अबाधित ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवावे,असेही ते म्हणाले.”
 
Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content