Details
“विद्वान राजकारणी, मनस्वी संवादक!”
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
माणूस शरीराने पांगळा असला तरी विद्वत्तेमुळे, अभ्यासामुळे जीवनात पुष्कळ उंची गाठू शकतो. एस. जयपाल रेड्डी हे बालपणीच पोलिओची शिकार झाले होते. दोन्ही पायात कायमचे पंगुत्व आलेले होते. पण जिद्द, अभ्यास आणि कमालीची बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यांनी यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. जयपाल रेड्डी यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक सूज्ञ व सुजाण व्यक्तिमत्व लोपले आहे. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत जयपाल रेड्डी यांनी आंध्र प्रदेश विधानसभेत 1969 पासून सलग चार वेळा आमदार म्हणून काम केले. नंतर ते चार वेळा लोकसभेत तर दोन वेळा राज्यसभेत निवडून गेले होते. त्यांच्या संसदीय कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सव लवकरच होऊ शकला असता. रेड्डी यांनी अखेरचा कालावधी काँग्रेसमध्ये व्यतित केला तशीच राजकीय कारकिर्दीची सुरूवातही काँग्रेसमध्येच केली होती. मात्र मध्यंतरीची पंधरा वीस वर्षे ते कट्टर काँग्रेस विरोधक म्हणून राजकारणात लढत होते.
संसदेच्या वरिष्ठ सभागृहात, राज्यसभेमध्ये, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस. जयपाल रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तेव्हा सभागृहाचे सभापती व्यंकय्या नायडू यांना दुःख अनावर झाले. ”रेड्डी यांचे जाणे माझ्यासाठी खूप वेदनादायी आहे. त्यांच्या निधनामुळे देशाने एक ज्येष्ठ खासदार, एक प्रभावी वक्ता आणि एक कुशल प्रशासक गमावला आहे.”, असे ते म्हणाले. नायडू आणि रेड्डी हे आंध्र विधानसभेत आमदार म्हणून एकाच बाकावर बसत असत. रेड्डींचे प्रत्येक विषयाबाबतचे ज्ञान, आकलन क्षमता, इंग्रजी आणि तेलगू भाषेवरील पकड आणि उर्दू भाषेबाबतची उत्तम जाण यामुळे नायडू प्रभावित जाले होते. आंध्र प्रदेशात जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचेच वर्चस्व होते तेव्हा ते युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले होते. विद्यार्थी चळवळीतून त्यांचे नेतृत्त्व पुढे आले. पण जेव्हा काँग्रेसमध्ये हुकूमशाही वृत्ती डोके वर काढू लागल्या तेव्हा पक्ष सोडून बाहेर पडले. जनता पार्टीच्या सर्व प्रयोगांमध्ये ते आघाडीवर होते. जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या पहिल्या जनता सरकारचे ते पाठीराखे होते.
१९८० मध्ये जनता पार्टीतून भारतीय जनता पक्ष फुटून निघाला. समाजवाद्यांनीही वेगळ्या चुली थाटल्या. त्यांनी व्ही. पी. सिंहांच्या काळात जनता दलाच्या प्रयोगात भाग घेतला. जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी व यशवंत सिन्हांनी जनता दलाच्या निवडणूक चिन्हापासूनची सारी पक्ष उभारणीची कामगिरी पार पाडली होती. यशवंत सिन्हांनी त्या काळातील रंजक हकीकत सांगितली आहे. नवे निवडणूक चिन्ह कोणते असावे यावर या दोघांनी खल करून भारतीय ध्वजावरील अशोक चक्राशी साधर्म्य असणारे पण निराळे दिसणारे चक्र हे चिन्ह निवडले. त्याला विश्वनाथ प्रताप सिंह आदी नेत्यांची मान्यता घेऊन हे दोघे तरूण उत्साही सरचिटणीस निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले. आयोगाने चिन्हाला हरकत नसल्याचे तोंडी सांगितले. एव्हढ्या भरवशावर अतिउत्साहाच्या भरात रेड्डी व सिन्हांनी लगेच जनता दलाच्या कार्यालयात जाऊन पत्रकार परिषद घेऊन ते चिन्ह मिळाल्याचे जाहीर केले. पण आयोगाने हरकत घेतली. तुम्हाला चिन्हाचे वाटप झालेले नसताना तुम्ही प्रचार सुरू कसा केलात, असा ठपका ठेवत आता ते चिन्ह गोठवणार अशी भूमिका आयोगाने घेतली. त्यानंतर या दोघांनी धावाधाव करून आयोगाच्या मिनतवाऱ्या केल्यानंतर ते चक्र चिन्ह मान्य झाले.
रेड्डी यांच्या आयुष्यातील राजकीय वळणेही मोठी होती. जनता दलाचे नेते म्हणून त्यांनी राजीव गांधींच्या काँग्रेसवर टीकेचे प्रखर प्रहार केले. १९९९ मध्ये सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या तेव्हा रेड्डी पुन्हा काँग्रेस पक्षात आले. कारण जनताचे सारे प्रयोग असफल होत असल्याचे राजकीय वास्तव त्यांनी स्वीकारले. त्यांच्या विद्वत्तेला व राजकारणातील अनुभवाला सोनिया गांधींनी चांगला मान दिला आणि जयपाल रेड्डी वाजपेयी सरकारच्या कालावधीत सोनिया गांधींच्या निकटच्या सल्लागारांपैकी एक म्हणून चमकले. रेड्डी भाषाप्रभू होते. जागतिक वांग्मय व तत्त्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास सखोल होता. ते फ्रेंच आणि इंग्लिश तत्व्.वेत्त्यांची उद्धृते सहज बोलताबोलता मांडत तेव्हा ऐकणारे थक्क होऊन जात. आणि ती उद्धृतेही तत्कालीन स्थितीचे नेमके वर्णन करणारी व म्हणूनच चपखल बसणारी अशीच असत.वाजपेयींनी २००२ मध्ये अयोध्येत शीलान्यास करण्याची परवानगी दिली व मोठे वादळ देशभर उठले. बाबरी मशीद पडल्याचा सारा राग पुन्हा व्यक्त होऊ लागला. तेव्हाच्या राजकीय वादंगात रेड्डींनी अफलातून आणि भारतीय राजकारणात कधीही वापरले न गेलेले असे शब्दप्रयोग प्रचारात आणले. त्यामुळे वाद तीव्रतर बनला. ते म्हणाले की वाजपेयींनी शीलान्यासाची ही जी चूक केली आहे ती पर्वतप्राय आहे. हे मराठीत ऐकायला वाचायला ठीक वाटते. पण इंग्रजीत संभाषण करणाऱ्या जयपाल रेंड्डींनी या घटनेचे वर्णन “ह्युमंगस् फ्रॉड” असे केले. ते भाजपा व मित्रपक्षांच्या जिव्हारी लागले. या शब्दाचा नेमका अर्थ काय? हा संसदीय शब्दप्रयोग आहे की नाही? ते शब्द संसदेतून हद्दपार करावे लागतील.. या मुद्द्यांवर रालोआचे नेते खिंड लढवत होते व डिक्शनऱ्या घेऊन डोकी खाजवत होते. ह्युमंगस् याचा अर्थ वाजपेयी हे राक्षसी आहेत असे काही तरी रेड्डी म्हणत असावेत असा गैरसमज होता. पण त्या शब्दाचा खरा अर्थ पर्वतप्राय, महाप्रचंड असा असल्याचे दिसून आले तेव्हा हा शब्दप्रयोग संसदीय असल्याचाच निर्वाळा अध्यक्षांना द्यावा लागला.
अयोध्येसंदर्भात वाजपेयींच्या सार्वजनिक व खाजगी जीवनात किती भयंकर दरी आहे, तफावत आहे यावर रेड्डींनी जे प्रहार केले तेही त्यांच्या भाषाप्रभुत्वाचीच निशाणी ठरले. वाजपेयींच्या सार्वजनिक व खाजगी आयुष्यातील अंतर म्हणजे ह्युमंगस हाएतस, ए जायगॅंटिक गॅप, गारगंट्युअन गल्फ असल्याचे रेड्डींचे वर्णन अनेकांच्या डोक्यावरून जाणारे व त्यामुळे अधिकच हैराण करणारे ठरले. रेड्डींच्या या हुषारीचा विद्वत्तेचा व नेतृत्त्वाचा योग्य वापर सोनिया गांधींना संपुआ सत्तेच्या दोन्ही कालावधीत मंत्री म्हणून मात्र पुरेसा करून घेता आला नाही हे खेदाने नमूद करावे लागेल. जनता राजवटीमध्ये माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री म्हणून रेड्डींच्याच पुढाकाराने सरकारी दूरदर्शन व आकाशवाणीला स्वायत्तता देणाऱ्या प्रसार भारतीची निर्मिती होऊ शकली. संपुआच्या दुसऱ्या 2009 ते 2014 या कालावधीत रेड्डी अल्पकाळच मंत्री होते. त्यात सुरूवातीला ते पेट्रोलिअम मंत्री असताना त्यांनी रिलायन्सच्या मुकेश अंबांनीचा दबाव झुगारला होता. रिलायन्सच्या के.जी. खोरे तेल खाणीसंदर्भात भारत सरकार व रिलायन्सचा किंमतीचा वाद सुरू होता. रेड्डींनी त्याचे दर वाढवून देण्यास नकार दिला होता. रिलायन्सच्या बळापुढे रेड्डी फिके पडले व त्यांची रवानगी विज्ञान तंत्रज्ञान मंत्री म्हणून झाली. पाठोपाठ केंद्रीय मंत्रीमंडळाने रेड्डींचा विरोध डावलून रिलायन्सला तेलाचा हवा तितका वाढीव दर देऊन टाकला.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी