HomeArchiveविजयी मोदी!

विजयी मोदी!

Details
विजयी मोदी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एक दणदणित, खणखणित विजय संपादन केला आहे. भारतीय मतदार किती चतुर, किती विचारी आहे याचाही प्रत्यय त्यानिमित्ताने आला आहे. भारतीय मतदाराला कोणाला कोणत्या जागी संधी द्याची याचे पुरती समज आहे. महापालिकेला एका पक्षाला संधी, दुसऱ्या पक्षाला विधानसभेत संधी देत असतानाच तिसऱ्या पक्षाला लोकसभेची संधी असा फरक आपला मतदारराजा दखवू शकतो. त्याचाही प्रत्यय आला. पोटनिवडणुकीची गणिते सार्वत्रिक निवडणुकीत फसतातच याचाही हा अनुभव ठरला आहे. गेल्या वर्षी तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाला. भाजपाची मध्य प्रदेश व छत्तीसगढ या दोन राज्यांतील पंधरा वर्षांची सत्ता संपली तर राजस्थानी जनतेच्या प्रथेप्रमाणे भाजपाला सलग दुसरी संधी तिथे मिळाली नाही. विशेष म्हणजे या तीनही राज्यंमध्ये काँग्रसने सत्ता स्थापन केली. त्याआधी त्यांनी कर्नाटकात निराळे राजकारण करताना भाजपाच्या तोंडचा घास हिरावून घेतला होता.

नाही म्हणायला काँग्रेसला ते कसब गुजरातमध्ये दाखवता आले नाही. गुजरातमध्येही चार वेळेची भाजपाची सत्ता उलथवणे शक्य आहे असे वाटत होते.पण ते जमले नाही. शंभराच्या आत आमदारांची संख्या राहूनही सत्ता भजापाने कायम ठेवली. त्याचवेळी लोकसभेच्या दहा रिक्त जागंसाठी त्या वर्ष-दीड वर्षात ज्या निवडणुकी झाल्या त्यात भाजपाने जागा गमावलेल्याच होत्या. त्या सर्व घटकांची गोळाबेरीज विरोधी पक्षांनी आणि विद्वानांनी काढली होती की गेलेच आता मोदी-शाहंचे राज्य. पण दिल्लीतील एअर कंडिशंड कार्यालयात बसून कॉम्प्यूटर बडवणारे विद्वान ज्यांना मोदींनी खान मार्केट गँग असा नवा शब्द रूढ केला आहे त्यांनाही तळागाळातील माणूस जेव्हा भेटतो तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो. सूरजीत भल्लांच्या ग्रंथाची चौकट तीच होती. त्यांचे सिटझन राजमधील अंदाजही तंतोतंत प्रत्यक्षात उतरताना आपण पाहतोच आहोत.

या निवडणुकीच्या निकालांनी आता पंतप्रधान म्हणून जगात ताठ माननेने मोदींना वावरता येणार आहे. त्यांनी एका मुलाखतीतत नमूद केले होते की गेल्या पाच वर्षांत मी जेव्हाजेव्हा परदेशात गेलो तेव्हा भारताचे म्हणणे काय हे परदेशी नेते नीट ऐकून घेत होते कारण एक संपूर्ण बहुमताचे सरकार देशात फार वर्षांनी आले होते. त्याच न्यायाने भारताच्या सध्या सुरू असणाऱ्या निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. भारतात पुन्हा एखादे जोडतोड करून बनवलेले सरकार येते की पुन्हा एका पूर्ण बहुमताचे सरकार येते हे महत्त्वाचे आहे. त्यावर भारताची जगातील किंमत वाढते असा मोदींच्या त्या मुलाखतीचा मतितार्थ होता. ते त्यांना हव्या त्या मताधिक्यानेही होताना दिसत आहे. स्वतः नरेंद्र मोदी हे साडेसात लाखांच्या मताधिक्याने तर अमित शाहही तितक्याच मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.

त्यांच्या पाठीशी भाजपाचे ३०३, अशा दणदणित संख्येने खासदार उभे आहेत तर त्यांच्या नेतृत्त्वाखालील तीन डझन पक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे साडेतीनशे खासदार उभे असणार आहेत. मोदींनी त्यांच्या जाहीरनाम्यात जी जी वचने दिली आहेत त्यांची पूर्तता कऱण्याचे आव्हान आता त्यांच्यापुढे राहणार आहे. या विजयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे ते हे की देशात प्रथमच सत्तारूढ सरकारच्या बाजूने जनमताची लाट उठलेली दिसली आहे. २००४ मध्ये भारतीय जनता पक्षाला असे वाटत होते की त्यांनी जनसामान्यांसाठी उत्तम काम केले आहे. भारताची मन जगात उंचावली आहे असेही त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी इंडिया शायनिंग.. अशी एक जाहिरात मोहीम आखून प्रचार केला होता. पण, त्यांना तसे यश आले नाही. मात्र, आता खऱ्या अर्थाने मोदी इज शायनिंग..”
 
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content