HomeArchiveलोकसभा निवडणुकीत मिळालेल्या...

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावणार – राहुल शेवाळे

Details
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावणार – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी एक अनोखा संकल्प केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांना एकूण 4 लाख 24 हजार 913 मते मिळाली होती. मतांच्या या संख्येइतकेच वृक्ष येत्या 5 वर्षांत लावण्याचे राहुल शेवाळे यांनी ठरविले आहे.

‘प्लांट अ होप’ (Plant a Hope) अशा नावाने पुढील पाच वर्षे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात मुंबईतील विविध सामाजिक संस्थांनाही सहभागी करून वृक्षारोपणाची नवी चळवळ उभी केली जाणार आहे. येत्या 10 जूनला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत या उपक्रमाची, खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते सुरूवात केली जाणार आहे. मुंबईतील विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्या तसेच सामन्य नागरिक या सर्वांच्या माध्यमातून पाच वर्षांत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून मला मत देणाऱ्या प्रत्येक मतदाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी मला मिळालेल्या मतांइतक्या वृक्षांची लागवड करणार आहे. जागतिक हवामान बदलाच्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. ‘प्लांट अ होप’ या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपणाची नवी चळवळ उभी राहील, अशी आशा करतो, असे राहुल शेवाळे म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content