HomeArchiveराहुल शेवाळे यांच्या...

राहुल शेवाळे यांच्या ‘डेमोक्रॅसी अँड मी’ ला तरुणांची साद!

Details
राहुल शेवाळे यांच्या ‘डेमोक्रॅसी अँड मी’ ला तरुणांची साद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
भारतीय लोकशाहीबाबत तरुणांची मते जाणून घेण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी आयोजित केलेली ‘डेमोक्रॅसी अँड मी’ ही स्पर्धा युवकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाली. दक्षिण-मध्य मुंबईत आयोजित केलेल्या या स्पर्धतील 26 विजेत्यांना दिल्लीच्या राजपथावरील प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. तसेच या विजेत्यांना राष्ट्रपती भवन आणि संसद भवनही पाहता येणार आहे.

दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘डेमोक्रॅसी अँड मी’ या निबंध स्पर्धेची दुसरी फेरी आज चेंबूरचे आचार्य महाविद्यालय, सायनचे साधना विद्यालय आणि माटुंग्याचे खालसा माहाविद्यालय याठिकाणी उदंड प्रतिसादात पार पडली. दक्षिण-मध्य मुंबईतील सुमारे 1000 युवक-युवतींनी या स्पर्धेद्वारे लोकशाहीबाबतची आपली मते मांडली.

या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत दक्षिण-मध्य मुंबईतील सर्वच नामांकित महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. डी. जी. रूपारेल, रामनारायण रुईया, पोदार, कीर्ती, स्वामी विवेकानंद, एसआयईएस, एसआयडब्लूएस, खालसा, गुरु नानक, वसंतदादा पाटील, महात्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासह अनेक बड्या महाविद्यालयांतील सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेद्वारे, लोकशाहीबाबतची आपली प्रगल्भ मते मांडली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी मतदार ओळखपत्र अनिवार्य केल्याने अनेक विद्यार्थ्यांनी मतदार ओळखपत्रासाठी नोंदणी केली. लोकशाहीसारख्या सर्वव्यापी विषयावर, विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्ताने मिळाल्याने सर्व स्तरांतून खासदारांच्या या संकल्पनेला विशेष दाद देण्यात येत आहे. युवा पिढीच्या उदंड प्रतिसादामुळे मी भारावून गेलो आहे, अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content