HomeArchiveराहुल यांचे कडवे...

राहुल यांचे कडवे बोल!

Details
राहुल यांचे कडवे बोल!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पण शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हा राजीनामा फेटाळण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी राहुल यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांना पक्षाचे नेतृत्त्व करत राहण्याची विनंती केली. तथापि, राहुल यांनी राजीनामा मागे न घेण्याची आपली भूमिका कायम ठेवली. यासंदर्भात त्यांनी काही कडवे बोल काँग्रेसजनांना सुनावले. काँग्रसने या विषयावर आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्या मुलांची उमेदवारी लादली याकडे राहुजींनी लक्ष वेधले. कोण होती ही नेत्यांची मुले? राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत, भाजपचे भूतपूर्व केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे चिरंजीव मानवेद्र सिंह आणि भूतपूर्व केंद्रीय मंत्री संतोष मोहन देव यांच्या कन्या सुष्मिता देव. या पुढार्यां च्या मुलांना उमेदवारी देऊन काँग्रेसने घराणेशाहीला बढावा दिल्याची राहुल यांची तक्रार आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये काँग्रेसने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या महत्त्वाच्या हिंदीभाषिक प्रदेशात सत्ता खेचून आणली. पण या सत्तेचा लाभ ते लोकसभा निवडणुकीत उठवू शकले नाहीत. सत्ता येताच काँग्रेसमध्ये लाथाळ्या सुरू झाल्या. पाच महिन्यांतच काँग्रेसजनांनी या राज्यांत आपले वाटोळे करून घेतले. कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी युती करून काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. पण दक्षिणेकडील या हक्काच्या राज्यातदेखील काँग्रेस भुईसपाट झाली. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली 2017 साली काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. तेथे मात्र काँग्रेसने 13 पैकी 8 जागा जिंकून घवघवीत यश मिळविले. या सार्याप पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. पण 52 सदस्य असलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीने तो राजीनामा फेटाळला आहे. राहुल यांनीच अध्यक्षपदी राहवे अशी गळ कमिटीने घातली आहे. अर्थात राहुल यांची पुढील भूमिका काय राहिल हे लवकरच कळेल. पण काँग्रेसच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी दिलेला राजीनामा स्वागतार्ह आहे.

प्रियांका गांधी यांच्या नावाची कोणीतरी शिफारस करताच ‘माझ्या बहिणीला यात ओढू नका’, असे ठणकावून सांगत राहुल यांनी घराणेशाहीला बाणेदारपणे विरोध केला आहे. राहुल यांचा प्रामाणिकपणा त्यांच्या या ठाम भूमिकेवरून दिसून येतो. आतापर्यंत काँग्रेस ही गांधी-नेहरू घराण्याभोवती फिरत आली आहे. अर्थात, लोकशाही मार्गानेच हे घराणे सतत सत्तेवर आले आहे. काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही हे 21 व्या शतकातदेखील स्पष्ट झाले होते. मृतवत झालेल्या काँग्रेसला सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाने संजीवनी दिली. त्यांनी दोन लोकसभा निवडणुका जिंकून काँग्रेसला उर्जितावस्थेत आणली. पण काँग्रेसमधील स्वार्थी पुढार्यांवनी सतत आपापल्या पोराबाळांना पुढे रेटून काँग्रेसची दैना केली. राहुल गांधी यांनी यासंदर्भात परखडपणे भूमिका मांडून घराणेशाही लादणार्या काँग्रेसजनांचे कान उपटले आहेत. राहुल यांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content