HomeArchiveराज्यातला दुष्काळ प्रचाराच्या...

राज्यातला दुष्काळ प्रचाराच्या कचाट्यात

Details
राज्यातला दुष्काळ प्रचाराच्या कचाट्यात

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

किरण हेगडे

देशातल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच झाल्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम ही ती राज्ये. यामध्ये मिझोराम हे सर्वात लहान राज्य असल्यामुळे भाष्यकारांनी तिकडे लक्ष दिले नाही. मात्र, उरलेल्या चार राज्यांच्या संभाव्य निकालांवर राजकीय विश्लेषकांनी जोरदार चर्चा केली. या पाच राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही भारतीय जनता पार्टीची सरकारे असलेली राज्ये. त्यामुळे या राज्यांमध्ये पुन्हा भाजपा सत्तेवर येणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे. त्याच उत्सुकतेचा पुरेपूर वापर करत प्रसिद्दी माध्यमांनी मतदानाची वेळ संपल्या संपल्याच एक्झिट पोलला सुरूवात केली. सर्वेक्षण करून अंदाज वर्तवणाऱ्या बहुतांशी संस्था वा कंपन्यांनी या निवडणुकीत भाजपाला फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपा पुन्हा सत्तेवर येणार नाही याची खात्री अनेकांनी वर्तवली आहे. अनेक राजकीय विश्लेषकांनी या पाच राज्यांच्या निवडणुकांना मिनी लोकसभा निवडणूक म्हटल्याने लोकांनी लगेच त्याचा संबंध पुढच्या तीन-चार महिन्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकींशी जोडला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता किती प्रमाणात घटली याचा ताळेबंद या  निवडणुकीतील निकालाच्या अंदाजाशी जोडला गेला.

वास्तविक यानिवडणुकीचा लोकसभेच्या निवडणुकीशी कोणत्याही अर्थाने तुलना होऊ शकत नाही. राज्यांचे विषय वेगले असतात आणि केंद्राचे वेगळे. पण, भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर काँग्रेसने राहुल गांधी यांची छबी राज्यांच्या निवडणुकीत ही वापरल्याने ही लढाई भाजपा-काँग्रेस, अशी न राहता ती मोदी आणि गांधी यांच्यातली झाली आहे. त्यामुळेच या निकालांकडे जनतेचे लक्ष लागले आहे. मंगळवारी ही मतमोजणी होणार आहे. तेव्हा खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी मध्य प्रदेश आणि राजस्थान, हीदोन राज्ये काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वर्तवली गेल्याने काँग्रेसच्या कार्यकर्ते व नेत्यांना हुरूप आला आहे. रविवारी धुळे आणि अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. यावेळीही काँग्रेसचा उत्साह दुणावलेलाच होता. सोमवारी या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. तेव्हा या निवडणुकीत भाजपाचा कस किती प्रमाणात लागला हे स्पष्ट होईल. धुळ्यात भाजपाने पक्षाचे स्थानिक आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्त्वाला जाहीर बगल देत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे नेतृत्त्व उभे केले. नाशिक आणि जळगाव महापालिकेत महाजन यांनीच भाजपाकडे सत्ता खेचली होती. जळगावमध्ये भाजपाने पक्षाचे आमदार व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नेतृत्त्व मोडीत काढले होते. आता त्यांनी गोटे यांच्या नेतृत्त्वाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान दिले आहे. त्यामुळे  सोमवारी लागणाऱ्या या निकालांकडेही महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

एकीकडे या निवडणुकांचा फड रंगला असतानाच काँग्रेसने आपल्या जनसंघर्ष यात्रेचा चौथा टप्पा रविवारी पूर्ण केला. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये ही यात्रा झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींनी यात आवर्जून भाग घेतला. यावेळी झालेल्या जाहीर सभांमधून काँग्रेसच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपा तसेच शिवसेना सरकारवर सडकून टीका केली. या सरकारच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत जनतेने असंख्य हाल अपेष्टा भोगल्या आहेत. या अन्यायी सरकारची वेळ आता भरली असून पुढच्या सहा महिन्यांत काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा विश्वास या नेत्यांनी व्यक्त केला. सभेला संबोधित करताना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केंद्र व राज्य सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा पंचनामा केला. यासाठी त्यांनी या सरकारच्या अनेक घोषणांचे दाखले दिले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई, पीक विमा, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना अशा साऱ्या विषयांवर काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यातला दुष्काळ भीषण आहेच. राज्यसरकारने त्याच्या निवारणासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्रसरकारकडे ही राज्याने जवळजवळ आठ हजार कोटींच्या मदतीची मागणी केली आहे. काही महिन्यांतच लोकसभा निवडणुका आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. मागच्या निवडणुकीत यातल्या ४० पेक्षा जास्त जागा भाजपा आणि शिवसेनेने जिंकल्या होत्या. याखेपेला युती झाली नाही तरी किमान ३० जागा जिंकायच्या दृष्टीने भाजपाने पावले टाकली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मागितलेली मदतही देईल यात शंका नाही. पण, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना दुष्काळ निवरणासाठी मिळणारी मदत आणि सरकारी उपाययोजना कमीच वाटणार. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे दोन टप्पे अजून व्हायचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन कधीही पुन्हा होऊ शकते. अशा धुमश्चक्रीत दुष्काळ पीडित भरडला गेला नाही म्हणजे मिळवले.”
 
“किरण हेगडे

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content