HomeArchiveयवतमाळचे भंपक भित्रे!

यवतमाळचे भंपक भित्रे!

Details
यवतमाळचे भंपक भित्रे!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
अरे! आम्ही हे काय पाहत आहोत? 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक भीतीने थरथर कापत आहेत. त्यांच्या विजारी लघुशंकेने ओल्या झाल्या आहेत. त्यांची झोप उडाली आहे. एका 90 वर्षीय वृद्धेच्या परखड विचारांनी ते घाबरले आहेत. साहित्य संमेलनाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. किंबहुना, साहित्याच्या जागतिक इतिहासात असे भंपक भित्रे कधी आढळले नव्हते. मग ‘मराठी बाणा’ मिरवणार्‍या आमच्या शूर महाराष्ट्रात ते कसे जन्माला आले? प्रख्यात भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजकांनी मोठ्या मानाने साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलविले. वयाची आणि प्रकृतीची पर्वा न करता नयनताराजींनी हे निमंत्रण स्वीकारले. पण आपले विचार ऐकून यवतमाळच्या भेकड मंडळींची गाळण उडेल याची त्यांना काय कल्पना!

‘‘देशातील सध्याच्या परिस्थितीची प्रत्येकाला लाज वाटायला हवी,’’ असे नयनताराजींनी आपल्या छापील भाषणात म्हटले होते. पण त्यांचे ते खडे बोल ऐकून शासन दरबारी आपल्याला खडे चरायला लागतील या भीतीने आयोजकांनी त्यांचे निमंत्रणच रद्द केले. हे निमंत्रण रद्द करण्यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव आला आम्हाला ठाऊक नाही. आपण या प्रकरणात कोणताही हस्ताक्षेप केला नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आमचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. पण मग आयोजकांनी ही पळपुटेपणाची भूमिका का स्वीकारली? नयनतारा सहगल या बंडखोर लेखिका म्हणून प्रख्यात आहेत. सत्ताधीश जर चुकत असतील तर त्यांच्या विरोधात आवाज बुलंद करण्याच्या बाबतीत मशहूर आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांच्या त्या कन्या. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या त्या सख्या आत्येबहिण. त्यांचे वडील बॅ. रणजीत सीताराम पंडित हे साहित्य संस्कृतीचे विख्यात अभ्यासक. कोकणातील कुडाळ गावचे. उल्लेखनीय गोष्ट अशी की, इंदिरा गांधी यांच्याशी असलेले नातेसंबंध विसरून नयनताराजी आणिबाणीत इंदिरा गांधींच्या विरोधात उभ्या ठाकल्या. त्यांना अटकदेखील झाली. याचाच अर्थ त्या कोणत्याही पक्षाच्या नाहीत. त्यांचा विरोध आहे तो भंपक, लाचार आणि असहिष्णू विचारसरणीला. असा विरोध असंख्य भारतीयांचा आहे.

गेल्या साडेचार वर्षांतील मोदी राजवटीतील अनेक पापे आता भुताप्रमाणे राज्यकर्त्यांच्या मानगुटीवर बसली आहेत. त्यावर उतारा म्हणून रा. स्व. संघाने नितीन गडकरी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्त्व पुढे आणले आहे. नयनतारा सहगल यांनी आपल्या भाषणात काहीही चुकीचे सांगितले नाही. पुन्हा त्यांचे भाषण हे त्यांचेच आहे. मग आयोजकांनी घाबरण्याचे कारण काय? साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री निधीतून 50 लाख रूपये मिळतात. त्या पैशांवर साहित्य संमेलन पार पडते. नयनताराजी ठरल्याप्रमाणे उद्घाटनासाठी आल्या असत्या तर मुख्यमंत्री देणार असलेली देणगी त्यांनी नाकारली नसती. पण यवतमाळच्या भंपक आणि भित्र्या लोकांना हे कोण सांगणार? नयनताराजींचे निमंत्रण रद्द करून त्यांनी महाराष्ट्राच्या सभ्यतेला, संस्कृतीला आणि साहित्यविश्वाला काळीमा फासला आहे. आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो..”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content