HomeArchiveमुंबईतील भाजपा आमदार...

मुंबईतील भाजपा आमदार व नगरसेवक देणार एक महिन्याचा पगार

Details
मुंबईतील भाजपा आमदार व नगरसेवक देणार एक महिन्याचा पगार

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील सर्व आमदार आणि नगरसेवक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपला एक महिन्याचा पगार देणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. भाजपचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या परीने सहाय्यता करणार आहेत. लोढा यांनी मुंबईतील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार मदत करण्याचे आवाहनही केले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर आल्यामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. सामान्यापेक्षा १२ पट जास्त पाऊस पडल्याने शेकडो गावे पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. शेतीचे नुकसान होऊन हजारो घरेही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांकडे खाण्यासाठी अन्न नाही व परिधान करण्यासाठी कपडेही नाही. मुंबईतील लोकांचा इतिहास राहिला आहे की, देशात कुठेही आपत्ती आली असल्यास येथील लोक मदतीसाठी नेहमी पुढाकार घेतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अडीच लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असेही लोढा यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content