HomeArchiveमायमराठी मावशी इंग्रजीपुढे...

मायमराठी मावशी इंग्रजीपुढे हतबल!

Details
मायमराठी मावशी इंग्रजीपुढे हतबल!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

स्नेहा कोलते, उपसंपादक, दै. महाराष्ट्र दिनमान

मराठी बाणा आणि मराठी मातीचा वारसा सांगणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात मराठीपेक्षा वाघिणीचं दूध म्हणणाऱ्या इंग्रजीला नको तेव्हढं डोक्यावर चढवून ठेवलं गेलं. त्याला आता अनेक वर्षे उलटून गेली. हळूहळू महाराष्ट्र म्हणजे मराठ्यांचे, मराठी लोकांचे जे राज्य असे महाराष्ट्र इंग्रजाळले आणि आता याच आपल्या मराठी जनांच्या राज्यात मराठी प्रेमी पालकांना महासंमेलन भरवण्याची वेळ यावी यापेक्षा अधिक दुर्दैव कोणत्याच भाषेला लाभलं नसेल. आपली भाषा टिकावी, भाषेचा प्रसार प्रचार व्हावा याकरता मराठीप्रेमी माणसाला त्याच्याच राज्यात असे महासंमेलन आदी उपक्रमांचे आयोजन करावे लागणे ही खरेच शरमेची बाब म्हणावी लागेल.

गेल्या काही वर्षांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाची पाळेमुळे घट्ट होताहेत. त्यामागचे सर्वात मोठंकारण म्हणजे स्वतःला सुशिक्षित समजणारा इंग्रजी अंकीत पालकवर्ग. या बदलत्या जगात आपले अपत्य मागे राहू नये ही पालकांची अपेक्षा अगदीच रास्त आहे, मात्र, त्यासाठी परकीय भाषेची वाट चोखाळणे चुकीचे वाटते. इंग्रजीचे शिक्षण म्हणजे प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यामुळे प्रतिष्ठे पायी पालकवर्ग आपल्या खिशाला भगदाड पाडून मुलांना इंग्रजी माध्यमात घालतात. पण, युनोस्कोसारख्या जागतिक संघटनेनेच मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व दिले आहे हे या पालकांना कोण समजवणार? फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन यासारख्या आपल्याहून पुढे असलेल्या देशांमधील नागरिकांनी मातृभाषेच्या शिक्षणाला महत्त्व दिले. कारण, मातृभाषेचा संबंध मुलांच्या वैचारिक विकासाशी, मेंदूशी येत असतो. पण दुर्दैवाने आपल्या देशात इंग्रजी म्हणजे भविष्य असंमानणारा आणि तीभाषा यावी म्हणून संबंध शिक्षणच इंग्रजीतून देण्याचा जो एक विचार प्रवाह बळावला आहे तो मुलांसाठी अत्यंत घातक ठरतो आहे. यामुळेच भारतातील मातृभाषेतील शाळांना उतरती कळा लागली आहे. त्यात मराठी शाळा अव्वल म्हणायला हरकत नाही.

महाराष्ट्रात मराठी शाळा टिकवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय अनास्था असल्यामुळे या शाळा येत्या काही वर्षांत नामशेष होतीलकी काय अशी भीती मराठी प्रेमी पालकांना वाटते.  मायमराठी मावशी असलेल्या इंग्रजीपुढे हतबल वाटू लागली आहे. हे अघटित मराठी शाळांबाबत तरी घडू नये याकरताच मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आणि या संमेलनामधूनच मराठी शाळा टिकवण्यासाठी काय करता येईल यावर उहापोह झाला. मराठी शाळा मागे पडण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे शाळा संचालकांनी शिक्षण व्यवस्थेत ठेवलेल्या जुन्या पद्धती. आजकालची चार-पाच वर्षांची पोरं लॅपटॉप आणि मोबाईल सहज वापरतात.  मग, अशा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी यापुढची पावले उचलायला हवीत असा विचार मराठी शाळांच्या संचालकांनी केलाच नाही आणि इंग्रजी शाळांच्या संचालकांनी याच गोष्टीचं भांडवल करून शाळांमध्ये अद्ययावत गोष्टींचा भरणा केला. हसत खेळत शिक्षण, ज्ञान रचनावाद शिक्षणपद्धती राबवण्याची गरज असताना मराठी शाळांनी जुनाट शिक्षण पद्धतीच राबवली आणि परिणामी शाळेतील पटसंख्या वर्षानुवर्षे घसरत गेली. इंग्रजी भाषा ही शिकवायलाच हवी. पण इंग्रजी हे शिक्षणाचं माध्यम होता कामा नये. मातृभाषेतील ज्ञान आत्मसात करायला अधिक सोपं जात असल्याने जगभर मातृभाषेतील शिक्षणाला महत्त्व आहे. मात्र, आपल्या भारतात याविरोधात वातावरण निर्माण झाल्याने मातृभाषेत शिकवणाऱ्या शाळा कमी होत गेल्या. मराठी शाळांमध्ये पालकवर्ग पुन्हा परतायला हवा असल्यास मराठी शाळा संचालकांनीच पुढाकार घ्यायला हवा. इंग्रजी माध्यमातून जे शिक्षण दिलं जातं त्याच दर्जाचे अत्याधुनिक शिक्षण मराठी शाळांमध्ये ही दिलं जाईल याचा विश्वास मराठी शाळांनी निर्माण करायला हवा. विद्यार्थ्यांचा केवळ पुस्तकी विकास न होता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याकरता मराठी शाळांनी तसा कृतिबद्ध कार्यक्रम तयार करायला हवा. मराठी शाळेत शिकून गगनभरारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या जनजागरणात पुढाकार घेतल्यास नवे पालक पुन्हा मराठी शिक्षणाकडे वळतील. त्यासाठी या माजी विद्यार्थ्यांनीही मराठी माध्यमातील शिक्षणासाठी जनजागृती केली पाहिजे. पण, ही जनजागृती आपल्या घरातून सुरू झाली तरच उपयोगी ठरेल. अनेक पालकांना आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याची इच्छा असते. मात्र, आसपास चांगल्या मराठी शाळा नसल्याचा ठपका ठेवत ते इंग्रजी माध्यमाची वाट धरतात. मग या शाळा कितीही लांब असल्या तरीही पालक असा खर्च करायला तयार असतात. अशा वेळेस हाच खर्च मराठी शाळांसाठी केला तर सगळ्यांच्याच आसपास मराठी शाळा पुन्हा उभ्या राहायला मदतच होईल. मराठी शाळा वाचवण्यासाठी ज्या ज्या पुढाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे निदान त्यांनी तरी आपल्या मुलांना मराठीतून शिक्षण दिले तरी समाजात एक आदर्श निर्माण होईल.”
 
“स्नेहा कोलते, उपसंपादक, दै. महाराष्ट्र दिनमान

Continue reading

बंगालमध्ये कांटे की टक्कर तर, केरळमध्ये सत्तांतराचे संकेत

पश्चिम बंगालमधील मतदानाचा शेवटचा टप्पा बुधवारी पार पडल्यानंतर पाच राज्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये 'भाजप' आणि 'तृणमूल काँग्रेस'मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे तर, केरळमध्ये सत्तापालटाचे संकेत मिळत आहेत. आसाम, पश्चिम बंगाल,...

फलोदी सट्टाबाजार देतोय बंगालमध्ये सत्तापालटाचे संकेत

विधानसभा निवडणुका २०२६साठी फलोदी सट्टाबाजाराचा अंदाज एक्झिट पोल्सच्या अनुसरूनच दिसत आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांपूर्वी फलोदी सट्टेबाजीचा बाजार जोरात सुरू आहे. नवीनतम दर आणि अंदाज पश्चिम बंगालमध्ये बदलाचे संकेत देत...

बेंगळुरूमध्ये पावसाचा हाहाःकार; ७ जणांचा मृत्यू

बेंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने भीषण रूप धारण केले. शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध बोरिंग आणि लेडी कर्जन रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण अपघातात ३ मुलांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर...
Skip to content