HomeArchiveमानसिक आजारांच्या प्रतिबंधासाठी...

मानसिक आजारांच्या प्रतिबंधासाठी आयुर्वेद चिकित्सा उपयुक्त!

Details
मानसिक आजारांच्या प्रतिबंधासाठी आयुर्वेद चिकित्सा उपयुक्त!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी
`आयुर्मनोबोध’ या मानसरोगावरील भव्य राष्ट्रीय परिसंवादातील तज्ञांचे मत
आयुर्वेद व्यासपीठ, या सार्वजनिक विश्वस्त न्यासातर्फे भविष्यात सातत्याने वाढत जाणाऱ्या मानसविकार, या समस्येचा सर्व दृष्टिकोनातून उहापोह करण्यासाठी सर्व वैद्यांना उपयुक्त अशा आयुर्मनोबोध, या एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद व महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांची मान्यता होती. हा भव्य आयुर्वेदीय परिसंवाद रविवार दि. ३ फेब्रुवारी २०१९ रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. हा परिसंवाद सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपन्न झाला. पहिल्या सत्रात मानसविकार चिकित्सेत ओंकाराचे महत्त्व या विषयावर नाशिक येथील योगतज्ञ पौर्णिमा मंडलिक यांचे प्रात्यक्षिक सादरीकरण झाले.

मानसविकारातील ध्यानाचे महत्त्व या विषयावर औरंगाबाद येथील डॉ. जयंत बरिदे यांचे प्रात्यक्षिक झाले. या परिसंवादाचे उद्घाटन भारत सरकारचे केंद्रीय आयुष सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, महाराष्ट्र राज्याचे आयुष संचालक वैद्य कुलदीपराज कोहली, भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष वैद्य आशुतोष गुप्ता हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी पुणे येथील वैद्य अनंत भगवंत धर्माधिकारी आणि धुळे येथील वैद्य प्रभाकर तानाजी जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले. मनोवेद, गुग्गुळ–समग्र अध्ययन, यशस्वी चिकित्सा, आरोग्यवर्धिनी या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

पुढील सत्रात बुद्धी आणि तिची चिकित्सा व्यवहारातील उपयोगिता या विषयावर पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा यांचे व्याख्यान झाले. त्यानंतरच्या सत्रात नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या संचालिका वैद्य तनुजा नेसरी यांचे नैराश्या (डिप्रेशन)ची कारणे व चिकित्सा या विषयावर व्याख्यान झाले. भोजनानंतरच्या सत्रात डोंबिवली येथील आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य महेश ठाकूर यांचे मानसरोगावरील विविध अवस्थानुसार उपयुक्त औषधे या विषयावर व्याख्यान झाले. तसेच कोट्टाकल, केरळ येथील आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य प्रकाश मंगलासेरी यांचे आयुर्वेदातील स्नेहकल्पनाद्वारे मानसरोगांची चिकित्सा या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतरच्या सत्रात समुपदेशनाच्या पद्धती, आधुनिक दृष्टीकोन व आयुर्वेद या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात नाशिकचे मनोरोगतज्ञ डॉ. जयंत ढाके, वैद्य यश वेलणकर आणि नीलम मुळे यांनी मार्गदर्शन केले. या परिसंवादाच्या निमित्ताने वैद्य, पदव्युत्तर आयुर्वेद विद्यार्थी व शिक्षकांनी शोधनिबंध व भित्तीपत्रकांचे सादरीकरण शनिवार दि. २/२/१९ रोजी आयुर्वेद सेवा संघाचे आयुर्वेद महाविद्यालय गणेशवाडी, पंचवटी, नाशिक येथे दु. १२ ते ५ या वेळेत केले .पेपर व पोस्टर सादरीकरणाच्या सत्राचे उदघाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालीदास चव्हाण यांच्या हस्ते झाले. वैद्य वर्षा साधले, शीतल चव्हाण, शिशिर पांडे, राजन कुलकर्णी, संजीवनी राठोड, तेजस्विनी नाडे, सविता कुलकर्णी, सुचिता पांडे यांनी संयोजन केले. २५० वैद्यांनी शोधपत्रांचे व पोस्टरचे सादरीकरण केले. आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष शरद पाठक कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

परिसंवादाच्या निमित्ताने मानस रोग व आयुर्वेद याविषयीचे प्रदर्शनही दि. ३ फेब्रुवारी रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या आवारात आयोजित केले होते. विविध औषधी कंपन्यांचे स्टॉल्सही होते. प्रदर्शनाचे उदघाटन रणजीत पुराणिक यांच्या हस्ते झाले. सुमारे ३००० वैद्य या परिसंवादास भारतातील विविध राज्यांतून आले होते. हा भव्य परिसंवाद यशस्वी करण्यासाठी व्यासपीठाचे संस्थापक अध्यक्ष वैद्य विनय वेलणकर, विद्यमान कार्याध्यक्ष वैद्य संतोष नेवपूरकर, कार्यवाह वैद्य विलास जाधव, उपाध्यक्ष वैद्य रजनी गोखले, वैद्य सुविनय दामले, वैद्य आनंद टेंभूर्णीकर, वैद्य सूर्यकिरण वाघ, वैद्य राजा ठाकूर, वैद्य किरण पंडित, वैद्य मल्हार जोशी, वैद्य ज्ञानदा पंडित, वैद्य विजय कुलकर्णी, वैद्य एकनाथ कुलकर्णी, वैद्य आशुतोष यार्दी, वैद्य संतोष पाठक, वैद्य कमलेश महाजन, वैद्य सौरभ जोशी, वैद्य प्रदीप गवळी, वैद्य मयूर कुलकर्णी, वैद्य राजन कुलकर्णी, वैद्य पंकज दीक्षित, वैद्य प्रीती त्रिवेदी, वैद्य प्रज्ञा कुलकर्णी, वैद्य मृदुला दीक्षित, वैद्य देवदत्त देशमुख, वैद्य अनघा यार्दी, वैद्य शुभदा जगदाळे, वैद्य संदीप देवरे, वैद्य नितीन चव्हाण, वैद्य भूषण मोगल, वैद्य शिवानंद तोंडे, वैद्य शीतल चव्हाण, वैद्य वर्षा साधले आदींनी परिश्रम घेतले. सहाय्यक आयुर्वेद संचालक वैद्य व्यंकट धर्माधिकारी, प्राचार्य वैद्य दासरी, वैद्य प्रदीप भाबड, वैद्य मिलिंद आवारे, वैद्य विनय सोनाम्बेकर आदी परिसंवादास उपस्थित होते.”
 
“देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content