HomeArchiveमराठी भाषा साहित्य...

मराठी भाषा साहित्य आणि भाषा विषयांच्या पुरस्कारांचे वितरण!

Details
मराठी भाषा साहित्य आणि भाषा विषयांच्या पुरस्कारांचे वितरण!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

महेश एलकुंचवार, डॉ. कल्याण काळे, डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा सन्मान
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
आज मराठी भाषा वैश्विक भाषा म्हणून ओळखली जात आहे. मराठी भाषेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मराठी भाषा अधिकाधिक समृध्द होण्यासाठी नवीन लेखक, साहित्यिक, संगीतकार निर्माण होण्याची आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी केले.

२७ फेब्रुवारी, हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी राज्यशासनामार्फत मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी दिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे साहित्य व भाषाविषयक पुरस्कार आणि विविध साहित्य प्रकारांतील राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे याच कार्यक्रमादरम्यान गेल्या वर्षभरातील साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या मराठी साहित्यिकांचा विशेष सन्मानही याप्रसंगी करण्यात आला. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, साहित्यप्रेमी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे ही आपल्या सगळयांचीच जबाबदारी आहे. आणि त्यामुळेच मराठी भाषाप्रेमींनी आणि तरुण वाचक लेखकांनी येणाऱ्या काळात लिहिणे आणि बोलणे आवश्यक आहे. भाषांमधील म्हणी, अद्वितीय शब्दप्रयोग, बोलीभाषा, वाक्ये आणि त्या-त्या भाषेतील व बोलीभाषातील विशिष्ट शब्दांविषयी लिहिणे आवश्यक आहे. नवीन पिढी लेखन, साहित्य, संगीत या क्षेत्राकडे वळावी यासाठीच राज्यभर तालुक्याच्या ठिकाणी वर्षभरात १०० कार्यशाळा आयोजित करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. आतापर्यंत या विषयाच्या ५२ कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत, असे तावडे यांनी यावेळी सांगितले.

मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच, मराठी भाषा हे मध्यवर्ती सूत्र असलेला ‘मऱ्हाटी भाषासुंदरी’ हा सांगीतिक कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची निर्मिती व संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले होते तर ऋषिकेश रानडे, प्रथमेश लघाटे, शमिका भिडे, शरयू दाते, उज्ज्वल गजभार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे निवेदन विघ्नेश जोशी आणि पूर्वी भावे यांनी केले.

यावर्षीचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना आज प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार नागपूर येथील साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशन संस्थेला प्रदान करण्यात आला असून तीन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षीचा, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. कल्याण काळे यांना आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना प्रदान करण्यात आला असून दोन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे केळकर व पाडगांवकर ह्या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

या कार्यक्रमात भाषा संचालनालयाच्या ५ परिभाषा कोशांचे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या ९ नव्या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने, यंदा मध्यवर्ती संकल्पना म्हणून ‘मराठी म्हणी’ या विषयाला प्राधान्य देण्यात आले होते. मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात आले. राज्यातील ३२ साहित्यिकांना विविध साहित्य प्रकारात मिळालेल्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

सन २०१७ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मिती स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारप्राप्त लेखक/साहित्यिक पुढीलप्रमाणे- शशिकांत हिंगोणेकर, अमृत तेलंग, आशुतोष पोतदार, कृष्णांत खोत, सुधीर महाबळ, डॉ. उमेश करंबळेकर, वासुदेव मुलाटे, यशपाल भिंगे, ॲड. निशा शिवूरकर, डॉ. जयसिंगराव पवार, नरेश नाईक, डॉ. वर्षा गंगणे, सुरेश कृष्णाजी पोटोळे, डॉ. मृदृला बेळे, डॉ. उमा वैद्य, नामदेव माळी, अर्जुन व्हटकर, सतीश भावसार, ॲड. डी. आर. शेळके, प्रशांत दळवी, संगीता बर्वे, रमेश तांबे, डॉ. वैशाली देशमुख, प्रकाश गोपाल बोकील, डॉ. प्रकाश लोथे.”
 
“महेश एलकुंचवार, डॉ. कल्याण काळे, डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा सन्मान

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content