HomeArchiveमराठी अधिकाऱ्याला रेल्वेचे...

मराठी अधिकाऱ्याला रेल्वेचे महाव्यवस्थापकपद द्यावे – राहुल शेवाळे

Details
मराठी अधिकाऱ्याला रेल्वेचे महाव्यवस्थापकपद द्यावे – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईची लाईफलाईन म्हणवल्या जाणाऱ्या रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे मुंबईकरांना होणारा त्रास थांबवायचा असेल तर ‘जनरल मॅनेजर’ या पदावर मराठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकामुळे सामान्य प्रवाशांना झालेल्या त्रासाची दखल घेत, याबाबत रेल्वेमंत्रालयाने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही खासदार शेवाळे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक निवृत्त होऊन दीड महिना उलटला, तरीही नव्या अधिकाऱ्याची नेमणूक अद्याप करण्यात आलेली नाही. रिक्त असलेले महाव्यवस्थापकांचे पद, हेदेखील, मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या गोंधळामागचे एक कारण आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. या पदावर तातडीने अधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे. मात्र इथल्या प्रवाशांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी ‘जनरल मॅनेजर’पदी मराठी अधिकाऱ्याचीच नेमणूक करावी, अशी मागणी शेवाळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून मध्य रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार तक्रार करूनही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे या साऱ्या प्रकाराला नेमकं कोण जबाबदार आहे, नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला होता, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सामन्य जनतेला हवी आहेत. यासाठीच याबाबतची एक श्वेतपत्रिका रेल्वे मंत्रालयाने काढावी, अशीही मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content