HomeArchive`मराठी’साठी कवी, लेखक,...

`मराठी’साठी कवी, लेखक, प्रकाशक एकवटले!

Details
“`मराठी’साठी कवी, लेखक, प्रकाशक एकवटले!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लहान मुलांची भाषा बघितली तर मराठी कशी टिकणार, ही काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे. प्रकाशन व्यवसायात पन्नास टक्के घट झाली आहे. मराठीच्या दुरवस्थेविषयी सरकार गंभीर नाही. मराठी विषयाच्या सक्तीसाठी सरकारने कायदा करावा, म्हणून कायद्याचा मसुदा सरकारला दिला, तरी पुढे काही घडले नाही. राज्यात मराठी भाषा वाचवायची असेल तर सरकारने किमान दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करावा, अशी जोरदार व एकमुखी मागणी लेखक, कवी, शिक्षक, प्रकाशक यांनी मंगळवारी केली.

क्वचितच एकत्र येणाऱ्या मराठी सारस्वतांची मराठीच्या मुद्द्यावर एकजूट झाल्याचे दिसून आले. मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करावा व राज्यात मराठी भाषा प्राधिकरण स्थापन करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर १८ जूनला धरणे धरण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात हा विचार पुढे आला.

लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, प्रा. मिलिंद जोशी, मंगला गोडबोले, अश्विनी धोंगडे, नीलिमा गुंडी, संजय सोनवणी, प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, दीपक शिकारपूर, वि. दा. पिंगळे, डॉ. सतीश देसाई, अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, संगीता बर्वे, आश्लेषा महाजन, रविमुकुल, बंडा जोशी, क्षितिज पाटुकले, अंजली कुलकर्णी, अरूण फडके, अनिल गोरे यांसह अनेक लेखक, कवी, प्रकाशक, शिक्षक बैठकीला उपस्थित होते.

शिक्षण विनोदाच्या तावडीत

मराठी नाटकाचा व सिनेमाचा प्रेक्षक तसेच वाचक कमी झाला आहे. या दशकात मराठीपुढे मोठे संकट ओढावले आहे. मराठी टिकवायची असेल तर मोठा संघर्ष केला पाहिजे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन काळात आंदोलन केले पाहिजे. तामिळनाडूसारखी भूमिका घेतली तरच मराठी टिकेल, असे भाष्यकार रामदास फुटाणे यांनी ठणकावले. मराठी भाषा आणि शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडले आहे, अशी टपलीही त्यांनी मारली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content