HomeArchiveमतदानानंतर दुष्काळावर काम...

मतदानानंतर दुष्काळावर काम करा – उद्धव ठाकरे

Details
मतदानानंतर दुष्काळावर काम करा – उद्धव ठाकरे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शिवसेनाप्रमुखांची संभाजीनगरमधल्या सभेला संभाजीनगरचे मैदान तुडुंब भरलेले होते. तेव्हापासून ही जनता शिवसेनेसोबत आहे. नावापुढे राष्ट्रवादी लावून कोणी राष्ट्रवादी होत नाही. युती ही माझ्या महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी केली. केंद्रात, राज्यात आपले सरकार येणारच. मतदानानंतर ताबडतोब दुष्काळावर काम करा, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमधल्या जाहीर सभेत केले.

मराठवाड्यात पंतप्रधान आले होते. मतदान झाल्यानंतर जी वचने दिलेली आहेत ती सर्व कामे झाली पाहिजेत. मुला-मुलींच्या लग्नाच्या चिंतेमुळे, दारिद्र्यामुळे शेतकरी आत्महत्त्या वाढत आहेत. गरीब शेतकऱ्यांच्या मुलां-मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे शिवसेनेकडून आयोजन केले जाते. मे महिन्यात पुन्हा सामुहिक विवाहाचे आयोजन करू, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आहे. तुमच्या हक्काचे पाणी दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठिशी शिवसेना ठामपणे उभी आहे. आम्हाला सत्ता हवी पण ती जनतेसाठी. सरदार वल्लभभाई मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी निजामशाही मोडीत काढली. मुसलमान आमचे शत्रू नाहीत. आम्ही जात-पात, धर्म मानत नाही. मी शहीद अब्दुल हमीद यांच्या कबरीवर डोकं टेकवीन. आम्ही हिंदुत्वासाठी काम करतो. एमआयएम, राष्ट्रवादी, काँग्रेस हे कशासाठी काम करतात माहित नाही. मला पंधरा मिनिटे वेळ द्या बोलणाऱ्या ओवेसीला सांगा इथे मर्द आहेत. मत मागणारे कोणाचे वारसदार आहेत हे जनतेने पाहवे, असेही ठाकरे म्हणाले.

संभाजीनगर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. यातला एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. जो शिवसेनेशी गद्दारी करेल त्याचे शिवसेनेशी काहीही नाते राहणार नाही. 56 पक्ष युतीला गाडण्यासाठी एकत्र आले आहेत. छप्पन्न पिढ्या जरी वरून खाली उतरल्या तरी आम्हाला गाडू शकणार नाहीत. शरद पवार यांना विचारा जेव्हा केंद्रातून 72 लाख कोटी कर्जमाफी जाहीर झाली. त्यावेळेस महाराष्ट्रासाठी कर्जमुक्ती होण्यासाठी पाठपुरावा शिवसेनेने केला. आजही बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. केंद्रातल्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनेत काही त्रुटी होत्या त्या शिवसेनेने काढल्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देव, देश आणि धर्म यासाठी शिवसेना-भाजपची युती आहे. काँग्रेसवाले मंदिर, मंदिर फिरत आहेत. शिंदे साहेब भस्म जपून ठेवा. निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भस्म घेऊन हिमालयात जायचे आहे. जयंत पाटील बोलतात, शिवसेनेने भाजपला मिठी का मारली? मग काय तुम्हाला मिठी मारायची होती? शरद पवारांनी काँग्रेसची युती तोडली तेव्हा म्हणाले की मी यापुढे काँग्रेसमध्ये जाणार नाही. एकवेळेस तोंडाला काळं लावीन पण पुन्हा काँग्रेस नाही. शरद पवार तुम्हाला थोडे डांबर लावू का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

भगव्यामुळे संभाजीनगर सुरक्षित – सुभाष देसाई

संभाजीनगर सुरक्षित असण्याचं कारण म्हणजे भगवा झेंडा. संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकी दरम्यान बाळासाहेबांची घोषणा होती गर्व से कहो हम हिंदू है. बाळासाहेबांनी औरंगाबादचे संभाजीनगर केले. बाळासाहेबांनी एक हात वर केल्यावर इथले विरोधक शांत झाले आणि इथली जनता भगव्या खाली सुरक्षित झाली, असे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सांगितले.

चंद्रकांत खैरे यांचे त्यांनी कौतुक केले. नगरसेवक पदापासून त्यांनी सुरूवात केली. चार दिग्गज विरोधकांना याआधी धूळ चारल्यानंतर यावेळेसदेखील चंद्रकांत खैरे विजय मिळवतील. अखिलेश यादव, शरद पवार, मायावती अशा अनेकांना नरेंद्र मोदींना हरवायचे आहे. पण स्वतः निवडणूक लढायला तयार नाहीत. विकास आणि सुरक्षा या दोन मुद्यांसाठी आम्ही युती केली आहे. आयुषमान भारत, अटल पेन्शन योजना अशा अनेक योजना मोदींनी जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया थांबवण्यासाठी शिवसेना-भाजप सरकारची देशाला गरज आहे. पाकिस्तानचे अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानचे कंबरडे नरेंद्र मोदी यांनी मोडले. पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचा शिवसेनेचा आग्रह आहे. जगाला आश्चर्य वाटेल अशी तंत्रज्ञानात भारताची प्रगती झाली आहे. मोदी आयेंगे तो चांद पर तिरंगा होगा और अगर राहुल आयेंगे तो तिरंगे पे चाँद होगा, असेही देसाई म्हणाले.

हिरवा पाहिजे की भगवा? – चंद्रकांत खैरे

संपूर्ण देशाचा पाठिंबा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. चार वेळेस संभाजीनगरच्या जनतेने मला खासदार म्हणून दिल्लीत पाठवले. म्हणून आपल्या सर्वांसमोर मी नतमस्तक आहे. जनतेला हिरवा पाहिजे की भगवा पाहिजे? आज भगवा आहे म्हणून जनता सुरक्षित आहे, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content