HomeArchiveबालभारती महाविद्यालयात 'सर्वोदय...

बालभारती महाविद्यालयात ‘सर्वोदय उत्सव’ साजरा

Details
बालभारती महाविद्यालयात ‘सर्वोदय उत्सव’ साजरा

    07-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
राष्ट्रपिता महात्मा गांधींजीच्या १५०व्या जयंतीनिमित्त मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील बालभारती महाविद्यालयात गेल्या २ ऑक्टोबर २०१८पासून ते यंदाच्या २ ऑक्टोबर २०१९पर्यंत “”सर्वोदय उत्सव”” या विशिष्ट कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी पुस्तक मेळा, खादी प्रदर्शन, दानोत्सव इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बालभारती महाविद्यालय १ ऑक्टोबर २०१९ ते ५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये गांधीजयंती साजरी करण्यात आली.
 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा गांधीजींच्या जीवनावर, विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, भाईंदर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महात्मा गांधींजींच्या जीवनावर आधारित चलचित्रांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना महात्मा गांधींजींच्या कार्याची ओळख व्हावी याकरिता अध्यात्माचे ख्यातनाम प्रवचनकार व्याख्याते, प्रसिद्ध लेखक रमेशभाई ओझा यांना निमंत्रित करण्यात आले होते‌. त्यांच्या सुश्राव्य व्याख्यानामुळे महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाला अभूतपूर्व झळाळी प्राप्त होत या महोत्सवाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.
 
 

 
 
 
या कार्यक्रमाचा समारोप २ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रभातफेरी घेऊन करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींजींच्या प्रिय भजनांचे गायन केले‌. गांधीजींच्या विचारांचे घोषवाक्यातून दर्शन घडविले. समाजातील विविध स्तरातील लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी बालभारती संस्थेच्या विश्वस्त व सदस्यांनी विशेष सहकार्य केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांबरोबर प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला.
 

 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“राष्ट्रपिता महात्मा गांधींजीच्या १५०व्या जयंतीनिमित्त मुंबईच्या कांदिवली पश्चिम येथील बालभारती महाविद्यालयात गेल्या २ ऑक्टोबर २०१८पासून ते यंदाच्या २ ऑक्टोबर २०१९पर्यंत “”सर्वोदय उत्सव”” या विशिष्ट कार्यक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी पुस्तक मेळा, खादी प्रदर्शन, दानोत्सव इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बालभारती महाविद्यालय १ ऑक्टोबर २०१९ ते ५ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये गांधीजयंती साजरी करण्यात आली.”
 

“या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा गांधीजींच्या जीवनावर, विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा व एकपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, भाईंदर येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महात्मा गांधींजींच्या जीवनावर आधारित चलचित्रांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना महात्मा गांधींजींच्या कार्याची ओळख व्हावी याकरिता अध्यात्माचे ख्यातनाम प्रवचनकार व्याख्याते, प्रसिद्ध लेखक रमेशभाई ओझा यांना निमंत्रित करण्यात आले होते‌. त्यांच्या सुश्राव्य व्याख्यानामुळे महात्मा गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाला अभूतपूर्व झळाळी प्राप्त होत या महोत्सवाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.”
 
 

 
 
 
या कार्यक्रमाचा समारोप २ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रभातफेरी घेऊन करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींजींच्या प्रिय भजनांचे गायन केले‌. गांधीजींच्या विचारांचे घोषवाक्यातून दर्शन घडविले. समाजातील विविध स्तरातील लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी बालभारती संस्थेच्या विश्वस्त व सदस्यांनी विशेष सहकार्य केले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांबरोबर प्रभातफेरीमध्ये सहभाग घेतला.

 

 

“राष्ट्रपिता महात्मा गांधी””सर्वोदय उत्सव””मुंबईच्या कांदिवली पश्चिमबालभारती महाविद्यालय”

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content