HomeArchiveपुन्हा एकदा मेंदीच्या...

पुन्हा एकदा मेंदीच्या पानावर..

Details
पुन्हा एकदा मेंदीच्या पानावर..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पंचवीस वर्षांपूर्वी अविट गोडीच्या सुमधूर गीतांनी अवघ्या महाराष्ट्र व मराठी जगताला नादावून सोडलेल्या अष्टगंध निर्मित मेंदीचं पान पुन्हा प्रकटले आहे. 26 जुलैला तुफानी पर्जन्यवृष्टी असतानाही डोंबिवलीत मेंदीच्या पानाचा पुनरागमनाचा शुभारंभ सोहळा संपऩ्न झाला. रसिकांनी उदंड प्रतिसाद देत आपण या प्रतिक्षेत होतो याची पावती दिली.

सर्वेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात प्रथम तुला वंदितो, मेंदीच्या पानावर, हा रूसवा सोड सखे, माझे राणी.. यासह सोळा गीतं सादर झाली. उत्तरार्धात रात्रीस खेळ चाले, येग रामाच्या, गोमू माहेरला जा, चंद्र आहे साक्षीला, गोमू संगतीनं.. यासह 12 गाणी सादर झाली. प्रभंजन-कीर्ति मराठे, दीपक कुंटे-काश्मिरा, भानुदास, प्रणिता, यांच्या संयुक्त व एकल गीत सादरीकरणाला रसिक जोरदार प्रतिसाद देत होते. मेंदीच्या पान प्रयोगाचं वैशिष्ट्य असलेले सूत्रधार व निवेदक बच्चू पांडे. त्यांच्या सादरीकरणाला प्रचंड प्रतिसाद डोंबिवलीकरांचा लाभला.

सूर म्हणतो साथ दे.., दिवा म्हणतो वात दे.., गाण्याच्या या मैफलीला रसिका अशाीच साथ दे.., या गोड आवाहनाने मेंदीच्या पानाची सुरूवात हे एक आगळे वैशिष्ट्य. या दुसऱ्या शुभारंभातही ती तशीच झाली, त्यामुळे रसिक हरखून गेले.

अष्टगंध एकत्र आले

पंचवीस वर्षांनी उदय चितळे, प्रभंजन मराठे, भानूदास देशपांडे, अनिल जोशी, मधू बने, श्रूतकीर्ति मराठे, वासुदेव बापट, बच्चू पांडे हे अष्टगंध एका अनामिक प्रेरणेने एकत्र आले. पाच जून 2019 रोजी, प्रदीर्घ काळानंतर बच्चू पांडे यांनी सर्वांना एकत्र आणले. मेंदीच्या पानाचं पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय सर्वांनी चार तास सुसंवाद साधून घेतला. त्यानंतर सारेच तयारीस लागले. त्यानंतर अवघ्या दिड महिन्यातच मेंदीचं पान.. पुन्हा प्रकटले. आता संगीतवेडा महाराष्ट्र त्याचे स्वागत कसे करतो याची उत्सुकता आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content