HomeArchive‘परमसिद्धी’ 63व्या क्रमांकावर!

‘परमसिद्धी’ 63व्या क्रमांकावर!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
सी-डॅक येथे राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग मिशन (एनएसएम) अंतर्गत स्थापन केलेल्या उच्च कामगिरी कम्प्यूटिंग-कृत्रीम बुद्धिमत्ता (एचपीसी-एआय) सुपर कॉम्प्युटर परमसिद्धीने 16 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या जगातील अव्वल 500 सर्वात शक्तिशाली एकसंध संगणक प्रणालीमध्ये जागतिक क्रमवारीत 63वा क्रमांक पटकावला आहे.
 
“एआय यंत्रणा प्रगत साहित्य, संगणकीय रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र यासारख्या क्षेत्रात पॅकेजेसच्या ऍप्लिकेशनच्या विकासाला बळकटी प्रदान करेल आणि औषधाची रचना आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रणालीसाठी एका व्यासपिठा अंतर्गत अनेक पॅकेजेस विकसित केली जात आहेत आणि मुंबई, दिल्ली, चेन्नई, पटना आणि गुवाहाटीसारख्या पूरग्रस्त मेट्रो शहरांसाठी पूर पूर्वानुमान पॅकेजेस विकसित करण्यात येत आहेत. जलद सिमुलेशन, मेडिकल इमेजिंग, जीनोम सीक्वेन्सिंग आणि पूर्वानुमान या माध्यमातून कोविड-19विरूद्धच्या लढाईत संशोधन आणि विकासाला यामुळे गती प्राप्त होईल आणि भारतीय जनतेसाठी आणि विशेषत: स्टार्ट-अप्स आणि एमएसएमईसाठी हे वरदान आहे.”
  

 
“अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर्ससाठी हे एक वरदान आहे आणि एनसीएमआरडब्ल्यूएफ आणि आयआयटीएमद्वारे हवामान अंदाज पॅकेजेस, तेल आणि गॅस शोधासाठी भू-शोध पॅकेजेसच्या चाचणीसाठी; एरो-डिझाइन अभ्यासासाठी पॅकेजेस; संगणकीय भौतिकशास्त्र आणि गणिताचे अनुप्रयोग आणि शिक्षणासाठी ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी सहाय्य करेल.”
 

“ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. जगातील सर्वात मोठ्या सुपर कॉम्पुटर पायाभूत सुविधांपैकी एक आज भारतामध्ये आहे आणि परमसिद्धी-एआयला मिळालेल्या क्रमवारीमुळे हे सिद्ध झाले आहे, असे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा म्हणाले.”
 
“परमसिद्धी सुपर कॉम्प्यूटर एनव्हीआयडीए डीजीएक्स सुपर पीओडी संदर्भ आर्किटेक्चर नेटवर्किंग व सी-डॅकच्या स्वदेशी विकसित एचपीसी-एआय इंजिन, सॉफ्टवेअर फ्रेमवर्क आणि क्लाऊड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे आणि सखोल शिक्षण, व्हिज्युअल संगणन, आभासी वास्तविकता, प्रवेगक संगणन तसेच ग्राफिक्स व्हर्च्युअलायझेशनमध्ये मदत करेल.”

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content