HomeArchive`दुष्काळा'त गाजते ते...

`दुष्काळा’त गाजते ते मोहिते घराणे!

Details
`दुष्काळा’त गाजते ते मोहिते घराणे!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नशिबात राजकीय दुष्काळ आहे. केंद्रात आणि राज्यात या दोन्ही पक्षांच्या नशिबी सध्या वनवास आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर याचवर्षी विधानसभेच्या निवडणुकादेखील होतील. पण सत्ता कोणाला मिळेल, हे आताच सांगणे कठीण आहे. तथापि, लोकसभेच्या उमेदवारीसाठी मात्र दोन्ही पक्षांत मारामाऱ्या सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी होळीच्या मुहूर्तावर भाजपची वाट धरली. पुत्र रणजितसिंह यांच्या मागोमाग वडील विजयसिंह मोहिते-पाटीलदेखील भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर आमच्या नजरेसमोर भूतकाळ उभा राहिला. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे वडिल शंकरराव मोहिते-पाटील सहकार महर्षि होते. ते कट्टर काँग्रेसवाले होते. सोलापूर जिल्ह्यात त्यांनी सहकारी साखर कारखान्यासह इतर सहकारी संस्थांचे मोठे जाळे उभारले होते. ते अकलूज मतदारसंघातून चार वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. ग्रामीण भागातील गरीब जनतेशी जोडले गेलेले शंकरराव मोहिते-पाटील 1972 साली महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे अडचणीत आले. नको त्या कारणासाठी मोहिते घराणे दुष्काळात गाजले. त्याचे असे झाले, त्यावर्षी राज्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्याचवर्षी शंकररावांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव विजयसिंह मोहिते-पाटील यांचे लग्न लावून दिले. या लग्नाचे आमंत्रण अकलूजच्या घराघरात दिले गेले. एक लाखाहून अधिक लोकांना लग्नात चांगले जेवण दिले गेले. ते जेवण महाराष्ट्राच्या इतिहासात `लक्ष भोजन’ म्हणून गाजले. वर्तमानपत्रांनी मोहिते-पाटलांवर जोरदार टिका केली. जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रांतून शंकररावांना झोडून काढणारे अग्रलेख प्रसिद्ध झाले. त्यावेळी आमचे वडिल `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. शंकरराव मोहिते-पाटलांनी त्यांच्यामार्फत मुंबईच्या पत्रकारांना अकलूजला येण्याचे निमंत्रण दिले. पत्रकारांचे एक पथक अकलूजच्या दौऱ्यावर गेले. त्यावेळी मोहिते-पाटलांनी आपण केलेले विधायक कार्य पत्रकारांना दाखविले. प्रत्येक घरात आपले संबंध असल्याचे सांगितले. आपल्या घरातील पहिल्या लग्नकार्यात या लोकांना न बोलावून कसे चालले असते, असा प्रश्नदेखील त्यांनी केला.

पत्रकारांनी मोहिते-पाटलांवर प्रश्नांची सरबत्ती केली. पण सहकारात आणि राजकारणात मुरलेल्या शंकररावजींनी प्रत्येक प्रश्नाचे चोख उत्तर दिले. मुंबईच्या एका `विद्वान’ पत्रकाराने शंकररावांना विचारले, `लक्ष भोजन देताना विहिरीतील पाणी थंड करण्यासाठी आपण विहिरीत बर्फाच्या लाद्या टाकल्या होत्या, हे खरे का?’ त्यावर शंकररावांनी त्या पत्रकाराला प्रतिप्रश्न केला, `तुमचे शिक्षण किती झाले आहे?’ तो पत्रकार म्हणाला, `बीएस्सी’ त्यावर शंकरराव ताडकन म्हणाले, `मग विहिरीत बर्फाच्या लाद्या टाकल्यावर पाणी थंड होत नाही, तर गरम होते हे तुम्हाला ठाऊक नाही का?’ सारांश, मुंबईतील वर्तमानपत्रांनी आपल्यावर केलेल्या टिकेला मोहिते-पाटलांनी समर्पक उत्तर दिले. पण लक्ष भोजनामुळे त्यांचे जे राजकीय नुकसान झाले होते, ते कधीच भरून निघाले नाही. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी त्यांना तिकीट नाकारले. त्यावर अकलूजमधील एक लाखांहून अधिक लोकांनी`शंकरराव मोहितेंना उमेदवारी द्या!’ अशी विनंती करणारी तार इंदिराजींना केली. पण इंदिराजी बधल्या नाहीत. पक्षाने आपल्या संकटकाळात अशाप्रकारे आपल्याशी वागावे, हे शंकरराव मोहिते-पाटलांना आवडले नाही. पण ते अखेरपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले.

त्यांनी कधीच काँग्रेस सोडली नाही. त्याचा लाभ त्यांचे चिरंजीव विजयसिंह मोहिते-पाटील यांना झाला. ते आमदार झाले, मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले आणि खासदारदेखील झाले. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील देखील राज्यसभेत जाऊन आले. सोलापूर जिल्ह्यात सुशिलकुमार शिंदे यांच्याशी पटत नसल्यामुळेच विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. पण ते काँग्रेसवालेच राहिले. आता मात्र त्यांच्या चिरंजीवांनी भाजपला आलिंगन दिले आहे. विजयसिंहदेखील त्यांच्या मार्गाने जाणार का? या प्रश्नाचे उत्तर काळाच्या उदरात दडले आहे. पण या साऱ्या पार्श्वभूमीवर मोहिते घराण्याचा भूतकाळ आठवला. त्यावेळी मोहिते घराणे गाजले ते नैसर्गिक दुष्काळामुळे. आज ते गाजत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नशिबी आलेल्या राजकीय दुष्काळामुळे! कट्टर काँग्रेसवाले मोहिते घराणे भाजपशी चुंबाचुंबी करत आहे. शेवटी गीतेत म्हटलेच आहे की, `परिवर्तन हेच जीवनाचे नाव आहे!’”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

टिटवीच्या अंड्यांमध्ये दडलेय पावसाचे रहस्य!

देशातील काही भागात शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, टिटवीची अंडी मान्सूनच्या आगमनाचे आणि तीव्रतेचे अचूक संकेत देतात. टिटवीने दिलेल्या अंड्यांची संख्या, अंडी घालण्याची जागा यानुसार पारंपरिकरित्या, पिढ्या न् पिढ्या देशाच्या काही भागात मान्सूनच्या पावसाचे ठोकताळे आणि अंदाज बांधले जातात. अंड्यांची...

आता देशातच बनणार एमआरआय मशिन, चाचण्यांचे दर होणार ७०%पर्यंत कमी!

भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला. आतापर्यंत अत्यंत महागड्या आणि आयात कराव्या लागणाऱ्या एमआरआय मशिनच्या बाबतीत भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. बेंगळुरूस्थित 'व्होक्सेल ग्रिड्स' या कंपनीने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने भारताचे पहिले स्वदेशी एमआरआय...

आठवलेंची ‘आरपीआय’ उत्तर प्रदेशात लढवणार विधानसभा निवडणूक!

उत्तर प्रदेशातील आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ने राज्यात आपली ताकद आजमावण्याची तयारी पूर्ण केली आहे. भाजपासोबतच्या महायुतीत (एनडीए) राहून आरपीआयने उत्तर प्रदेशात २५...
Skip to content