HomeArchive"दासावा"मध्ये रंगला आहे...

“दासावा”मध्ये रंगला आहे मुंबई शहर ग्रंथोत्सव!

Details
“””दासावा””मध्ये रंगला आहे मुंबई शहर ग्रंथोत्सव!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

एकशे अकरा वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या दादर सार्वजनिक वाचनालयात सोमवारपासून दोन दिवसांचा मुंबई शहर ग्रंथोत्सव होत आहे. या महोत्सवात वाचनसंस्कृती आणि ग्रंथ चळवळीला वाहिलेल्या दर्जेदार प्रबोधनात्मक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ग्रंथालय संचालनालय मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि दादर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुरू सभागृहात या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने हा ग्रंथोत्सव सुरू झाला.

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष धर्मेंद्र जोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. साडेअकरा ते दीड या दरम्यान वाचनसंस्कृती व ग्रंथ चळवळ कशी वाढेल या विषयावर परिसंवाद झाला. दुपारी नाट्य व खुली चर्चा रंगली. मी, फॅमिली, मोबाईल आणि वाचनसंस्कृती या विषयाचा त्यात वेध घेतला गेला. संध्याकाळी साहित्यातून उमललेले स्वरतरंग कार्यक्रम रंगला.

आज, मंगळवारी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत महात्मा गांधी यांचे साहित्य आणि विचार या विषयावर प्राध्यापक व्याप जवाहर मुथा यांचे व्याख्यान होईल. सकाळी 10 ते 11 या दरम्यान मराठी भाषा उपरी होते का यावर रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून परिसंवाद होणार आहे. यात सुशिला महाराव, डॉ. लीला गोविलकर आणि कांचन घाणेकर यांचा सहभाग होणार आहे दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मराठी साहित्यातील आधुनिकता या विषयावर रंगणाऱ्या परिसंवादात डॉ. शीतल पावसकर, लता पांचाळ, डॉ. प्रतिभा टेंबे मतप्रदर्शन करणार आहेत.
दुपारी दोन ते चार दरम्यान महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या आठवणींना त्यांचे कुटुंबीय उजाळा देणार आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे जयंत देशपांडे आणि दीपा देशपांडे यांच्या बद्दलच्या आठवणी रसिकांसमोर मांडणार आहेत. पुलंवरचा माहितीपट, घरगुती किस्से आणि त्याचबरोबर पुलंच्या शब्दांत फुलं, ही ध्वनिफीत रसिकांना पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर साडेचार ते पावणेपाच या दरम्यान गाजलांजली हा कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. सायंकाळी सहा वाजता ग्रंथोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती भीमराव जीवणे, चंद्रशेखर देशमुख आणि दत्ता कामथे यांनी दिली.”
 
“एकशे अकरा वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या दादर सार्वजनिक वाचनालयात सोमवारपासून दोन दिवसांचा मुंबई शहर ग्रंथोत्सव होत आहे. या महोत्सवात वाचनसंस्कृती आणि ग्रंथ चळवळीला वाहिलेल्या दर्जेदार प्रबोधनात्मक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ग्रंथालय संचालनालय मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि दादर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने धुरू सभागृहात या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने हा ग्रंथोत्सव सुरू झाला.

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष धर्मेंद्र जोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. साडेअकरा ते दीड या दरम्यान वाचनसंस्कृती व ग्रंथ चळवळ कशी वाढेल या विषयावर परिसंवाद झाला. दुपारी नाट्य व खुली चर्चा रंगली. मी, फॅमिली, मोबाईल आणि वाचनसंस्कृती या विषयाचा त्यात वेध घेतला गेला. संध्याकाळी साहित्यातून उमललेले स्वरतरंग कार्यक्रम रंगला.

आज, मंगळवारी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत महात्मा गांधी यांचे साहित्य आणि विचार या विषयावर प्राध्यापक व्याप जवाहर मुथा यांचे व्याख्यान होईल. सकाळी 10 ते 11 या दरम्यान मराठी भाषा उपरी होते का यावर रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून परिसंवाद होणार आहे. यात सुशिला महाराव, डॉ. लीला गोविलकर आणि कांचन घाणेकर यांचा सहभाग होणार आहे दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मराठी साहित्यातील आधुनिकता या विषयावर रंगणाऱ्या परिसंवादात डॉ. शीतल पावसकर, लता पांचाळ, डॉ. प्रतिभा टेंबे मतप्रदर्शन करणार आहेत.
दुपारी दोन ते चार दरम्यान महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या आठवणींना त्यांचे कुटुंबीय उजाळा देणार आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे जयंत देशपांडे आणि दीपा देशपांडे यांच्या बद्दलच्या आठवणी रसिकांसमोर मांडणार आहेत. पुलंवरचा माहितीपट, घरगुती किस्से आणि त्याचबरोबर पुलंच्या शब्दांत फुलं, ही ध्वनिफीत रसिकांना पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर साडेचार ते पावणेपाच या दरम्यान गाजलांजली हा कार्यक्रम श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. सायंकाळी सहा वाजता ग्रंथोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती भीमराव जीवणे, चंद्रशेखर देशमुख आणि दत्ता कामथे यांनी दिली.”
 
Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content