HomeArchiveतळकोकणातलं आडाळी उद्योगभरारीसाठी...

तळकोकणातलं आडाळी उद्योगभरारीसाठी सज्ज!

Details
तळकोकणातलं आडाळी उद्योगभरारीसाठी सज्ज!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

सतीश लळीत
[email protected]
आडाळी, तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातलं गोव्याच्या सीमेवरचं जेमतेम सहाशे वस्तीचं, शंभर उंबऱ्यांचं गाव एक मोठी भरारी घ्यायला सज्ज झालंय. ही भरारी शक्य झालीय ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एमआयडीसी इथं सुरू करत असलेली औद्योगिक वसाहत. इथल्या गावकऱ्यांनी कोणताही विरोध न करता या प्रकल्पाचं स्वागत करून आपल्या जमिनी दिल्या. साडेसहाशे एकर जागेत होत असलेल्या या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांनी यावं म्हणून पणजी (गोवा) इथल्या मांडवी हॉटेलमध्ये उद्योजक प्रोत्साहन गुंतवणूक मेळावा एमआयडीसीनं आयोजित केला होता. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि वित्त राज्यमंत्री व सिंधुदूर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेला हा मेळावा यशस्वी झाला. मेळाव्यातच तीन उद्योजकांनी जागेसाठी देकार दिला.

आडाळी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र हे उद्योजक आणि कामगार या दोहोंच्याही फायद्याचे आहे. या वर्षअखेरीपर्यंत ही वसाहत अत्याधुनिक सुविधायुक्त अशी मॉडेल औद्योगिक वसाहत बनवली जाईल, असं प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. परिषदेच्या अध्यक्षस्थानी सुभाष देसाई होते. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एन. अन्बलगन, गोवा कॉमर्स ऑफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष संदीप भंडारे, गोवा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार कामत, कोल्हापूर येथील शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, सिंधुदूर्ग चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष कमलाकर सावंत, उद्योजक अतुल पै-काणे, गजानन सावंत, प्रकाश म्हात्रे, ललित सारस्वत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आडाळी येथील एमआयडीसीमध्ये लवकरच सर्व सोयीसुविधा उभारल्या जातील असं सांगून पालकमंत्री केसरकर म्हणाले की, गोव्यातील उद्योजकांना उद्योगांच्या वाढीसाठी एक चांगली संधी आडाळी एमआयडीसीच्या निमित्ताने निर्माण झाली आहे. पाणी, वीज तसेच दळणवळणाच्या चांगल्या सोयीसुविधा या ठिकाणी आहेत. चिपी, मोपासारखे विमानतळ आणि थिवी, पेडणे, सावंतवाडीसारखी रेल्वेस्थानके जवळ आहेत. मुंबई–गोवा माहामार्गाचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आहे. बांदा ते आयी हा मार्ग लवकरच 100 फुटी होत आहे. त्यामुळे आडाळी एमआयडीसीला सर्व बाजूने कनेक्टीव्हिटी मिळणार आहे. हे औद्योगिक क्षेत्र डी प्लस झोनमध्ये येत आहे. त्याचा लाभ येणाऱ्या उद्योजकांना मिळेल.

सोयीसुविधा आणि उद्योगांची उभारणी एकाचवेळी होऊ शकते असे सांगून उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, आमची स्पर्धा आंतरराष्ट्रीय महामंडळांशी आहे. सध्या गोव्यामधील उद्योगांना विस्तारासाठी जागेचा प्रश्न भेडसावत आहे. हा प्रश्न आडाळी एमआयडीसीच्या माध्यमातून सुटेल. पश्चिम महाराष्ट्रातही उद्योगांना विस्तारीकरणाचा प्रश्न भेडसावत आहे. या उद्योजकांनी आडाळी एमआयडीसी येथे विस्तारीकरणाचा विचार करावा. डी प्लस झोनमध्ये येत असल्यामुळे याठिकाणी चांगल्या सवलती मिळणार आहेत. वीजेचे दर 2 रूपये प्रती युनिट असणार आहे. या एमआयडीसीसाठी 1 हजार 170 प्रती चौरस मीटर इतका दर जाहीर केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आडाळी येथे उद्योजकांसाठी कॅम्प उभारण्यात येणार आहे. याठिकाणी 5 हजार चौरस फूट ते 50 एकरपर्यंतचे भूखंड उपलब्ध आहेत. दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. उद्योजकांनी याठिकाणी उद्योग उभारण्यासाठी यावे असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एन. अन्बलगन यांनी यावेळी आडाळी एमआयडीसी क्षेत्राची माहिती दिली. याठिकाणी उपलब्ध होणार असलेल्या सुविधांची माहिती देऊन ते म्हणाले की, उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी एमआयडीसी कायमच तत्पर असते. सात दिवसांच्या आत कोणतीही समस्या सोडवली जात आहे. शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यश्र सुरेंद्र जैन, उद्योजक अतुल पै-काणे, गजानन सावंत, प्रकाश म्हात्रे, ललित सारस्वत यांनी आडाळी एमआयडीसीमधील गुंतवणूक कशी फायद्याची ठरणार आहे याची सविस्तर माहिती दिली. पै-काणे इंटस्ट्रिज यांनी 25 हजार चौरस फुटांच्या जागेची, सुजीत परूळेकर यांनी 10 हजार चौरस फूट जागेची तर आणखी एक उद्योजकांने 10 हजार चौरस फूट जागेची नोंदणी केली. या एमआयडीसीसाठी भूखंडाचे दर पुढीलप्रमाणे असणार आहेत. औद्योगिक वापरासाठी 1170 रुपये प्रति चौरस मीटर, निवासी वापरासाठी 1755 रूपये प्रती चौरस मीटर व वाणिज्य वापरासाठी 2345 रूपये प्रति चौरस मीटर असे आहेत.”
 
“सतीश लळीत

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content