HomeArchiveजयंत पाटील, वेळीच...

जयंत पाटील, वेळीच सावरा – उद्धव ठाकरे

Details
“जयंत पाटील, वेळीच सावरा – उद्धव ठाकरे”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जयंत पाटील या मातीशी आणि जमिनीशी द्रोह करू नका. तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात. वेळीच तुम्ही सावरा. पाकिस्तान आमचा दुश्मन आहे, तसा तुमचा दुश्मन आहे. जर उद्या युद्ध झाले पाकिस्तानने टाकलेला बॉम्ब घर पाहून पडणार नाही. धर्म बघून पडणार नाही. म्हणून सर्व मुसलमान बांधवांना आवाहन आहे की देशासाठी एकत्र या, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी माणगाव येथील जाहीर सभेत केले.

आपल्यासमोर मुद्दा सरळ आहे. उमेदवार कसा आहे, तो काय करणार आहे? रायगड म्हणजे शिवराय. अंतुले साहेबांनी कुलाबा याचे रायगड असे नाव केले, असे आमचे जुने नाते आहे. धनुष्यबाणाला मत म्हणजे स्वतःच्या हितासाठी दिलेले मत. आमचे भाजपसोबत मतभेद होते. ते वैयक्तिक नसून जनतेसाठी होते आणि आताही युतीसुद्धा जनतेसाठीच केलेली आहे. युती ही देव, देश आणि धर्मासाठी केली. पाच वर्षे आम्ही काम करत असताना हे थंडगार झोपले होते आणि आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. आता शरद पवार यांना दुष्काळग्रस्त शेतकरी दिसतो आहे का, असा सवालही त्यांनी केला.

गीते साहेब तुमच्यात आणि तटकरे यामध्ये खूप फरक आहे. त्यांनी किती प्रॉपर्टी जमवलेली आहे. तुम्हाला ते इतके वेळेस खासदार करूनही जमले नाही. माझ्या कोकणवासियांची जमीन घेऊन हे कारखानदार होणार आणि माझ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार हे आम्हाला पटणारे नाही. शिवराय यांना आपण देव का मानतो, कारण तो रयतेचा राजा होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी 50 ते 60 वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्ता केली. ते इतके माजले आहेत की पाच वर्षांत सुधारतील का, असा सवालही ठाकरे यांनी केला.

देशद्रोहाचे कलम काँग्रेसवाले काढून टाकणार. हे तुम्हा मतदारांना पटतंय का? आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत. काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. या देशाचे मुसलमानदेखील आमच्या सोबत आहेत. प्रत्येक मतदाराचं मत देशाचं भवितव्य घडवणारे आहे. गेली ६० ते ६५ वर्षे काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी घोटाळ्यांमागून घोटाळे करत देशावर दरोडा घातला. अशा काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडासाफ करा, असे आवाहनही त्यांनी केले.

तटकरे तुम्ही काय केले?

गीतेसाहेब तुम्ही विचारायचे होते की, तटकरे तुम्ही काय केले? उत्तर मिळेल की अनेक जमिनींमध्ये गुंतवणूक आहे. 100 कंपन्या आहेत. 100 हून अधिक कंपन्या तटकरे यांच्या आहेत. 800 एकर जमीन आपल्या नावाने आहे. धीरूभाई अंबानी यांच्या 32 आणि तुमच्या 100, ही प्रगती नैसर्गिक आहे का? जमीन आणि कंपन्यांसाठी तुमच्याकडे पैसे कुठून आले, असा सवाल शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी यावेळी केला.

प्रतिज्ञापत्रात पैशांचा उल्लेख केला गेलेला नाही. तुमचा मुलगा तुमच्यासोबत असतो. राहतो, फिरतो, मग तुम्हाला व्यवहार माहीत नाही यावर विश्वास कसा ठेवायचा? भ्रष्टाचाराने करोडो कमावणाऱ्या सुनील तटकरेंसारख्या नेत्याला तुम्ही निवडून देणार का, असेही ते म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content